लाहोरचे दिवस - १
या प्रांतातील पाहुणचार म्हणजे मोठा और प्रकार होता. शंकर शिवाजीच्या प्रांतातून आलेला ना ! त्यामुळे शंकरची जावयासारखी सरबराई सुरू झाली. तिथली भाषा पुष्तू 'सेनामदि' म्हणजे तुमचे नाव काय, ''नमस्कार'' या शब्दाला ' अश्तड मासे' हा प्रतिशब्द शंकर काही शब्द व वाक्ये शिकून घेतली. आंघोळीला चष्म्यावर जायचे म्हणजे झऱ्यावर. प्रत्येकाजवळ पिस्तुल, कट्यार किंवा रायफल असायचीच.
भोवतालच्या पर्वतरांगातील एका शिखरावर मरी नावाचे थंड हवेचे ठिकाण होते. इतक्या दूर आल्यावर मरीपर्यंत जाऊन यावे अस शंकरला वाटत होते. सचदेव म्हणाला, ''पहाडातून पंचवीस मैल चढउतार करण्याची तुमची तयारी असेल, तर माझी हरकत नाही.'' दर शंभर पावलावर मुक्काम ठोकीत, मेटाकुटीने तीन-चार पहाड पालथे घातल्यावर, शिखरावरून जो भव्य देखावा नजरेसमोर उभा राहिला त्याने त्यांचा सारा शीण नाहीसा झाला. परतताना एका दुकानात दोघे झोपले. पायाची आग होऊ लागली म्हणून पाहिले, तर पायाला फोड आलेले. तसेच काठी टेकीत एक दिवसाचा पल्ला पार करून ते अँबाटाबादला पोचले. पायाचे फोड दबताच शंकर पेशावरला जाण्याची घाई करू लागला. सचदेव त्याच्या घरीच राहण्याचा आग्रह करीत होता अखेर सचदेवने विचारलं; ' 'पेशावरला तुम्ही कोणाकडे जाणार आहात?'' लाहोर ते हसन या प्रवासात शंकरला एक म्हातारा पठाण भेटला होता. धिपाड देह, तजेलदार डाळे, पांढरीशुभ्र दाढी असा तो शंकरला लाघवी भाषेत ''पेशावरला आमच्या घरी पाहुणचार घ्यायला या'' ''असे फिरून फिरून म्हणत होता. ही हकोगत ऐकताच सचदेव व त्याचे आप्तेष्ट एकदम दचकले आणि शंकरला हात जोडीत म्हणाले'' ''भले महाराज! तुम्हाला हा प्रश्न विचारण्याची बुद्धी आम्हाला झाली आणि प्रश्नाचे सरळ उत्तर देण्याची बुद्धी तुम्हाला झाली, हे दोघांचे नशिबच म्हणायचं! नाहीतर तुम्ही काही परत येत नव्हता.'' शंकरला त्यांच्या बोलण्याचा अर्थ नीट लागेना. तेव्हा सचदेवने सांगितलं, ''परप्रांतातील लोकांना गोड बोलून न्यायचे, सरकारतचे हात पोचत नाहीत अशा ठिकाणी नेऊन त्यांचा जीव घेण्याची धमकी घालून, त्यांच्या घरच्या लोकांकडून खंडणीची मागणी करायची, असा राजरोस धंदा तेथे चालतो. तुमच्यावर असा प्रसंग आला असता, तर आम्हाला तुमच्या वडिलमंडळींना तोंड दाखवायला जागा उरली नसती. नशिब तुमचं म्हणून तुम्ही वाचलात. आता लाहोरला नेऊन तुमच्या वडील मंडळींच्या स्वाधीन केलं की आम्ही सुटलो.'' सचदेवचे उद्गार ऐकून आपला पुनर्जन्म झाल्याचा आनंद याची देही याची डोळा शंकरला मिळाला.
लाहोरला परतल्यावर उन्हाळ्यामुळे सकाळ नऊनंतर बाहेर पडायची सोय नसे. आंधी आली म्हणजे धुळीच्या वादळाने १२३ अंश उष्णतामानात सर्वांना पुरेपुरे होऊन जायचे. थंडी आली की तिचाही तडाका जबरदस्तच; शंकर सफाईने हिंदी बोलू लागला आणि त्याला पंजाबीही समजू लागले. एक दिवस शंकर तळमजल्यावरील वर्गात उद्योगात असताना मध्यम उंचीचे, किंचित जाड आणि काळसर रंगाचे एक गृहस्थ स्टुडिओत आले. पंडीतजींना भेटायची इच्छा व्यक्त केल्यावर शंकरने त्यांना त्यांचे नाव विचारले. ते उत्तरले ''लजपतराय'', आपण केवढ्या मोठ्या देशभक्तापुढे उभे आहोत याची कल्पना येताच शंकरची मोठी गडबड उडाली. त्यांना बसायला खुर्ची देऊन वर जाऊन तो पंडीतजींना घेऊन आला. पुढच्या खेपेस ते आल्यावर शंकरला त्यांच्याशी थोडे बोलायला मिळाले. पुन्हा भेटल्यावर त्यांनी शंकरला कोण, कुठला, अशी विचारपूस केली. त्यामुळे धीर येऊन शंकरने त्यांना विचारलं, '' आपला एक फोटो काढायला मला परवानगी द्याल का?''
Hits: 89