लहानपण

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

शंकरभाऊंचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ रोजी सोलापुरात झाला. त्यांचे वडील-डॉक्टर वासुदेव काशिनाथ किलॉस्कर यांनी १८८८ मध्ये सोलापुरात वैद्यकोय व्यवसायास सुरुवात केली होती. सोलापुरात तेच पहिले एल. एम. अँड एस. पदवी घेतलेले डॉक्टर. त्यामुळे धंद्यात त्यांचे बस्तान चांगले बसले होते. पण ते नुसते डॉक्टरच नव्हते, तर त्यांना यंत्रकलेची उपजत आवड असल्यामुळे दवाखान्याशेजारीच-कसबा पेठेत त्यांनी आपला शिवाजी मेटल वर्कर्स नावाचा छोटा कारखाना सुरू केला होता. महाराष्ट्रातील हा पहिलाच यांत्रिक उद्योग झाला होता.

वडील पेशाने डॉक्टर असले तरी वृत्तीने समाजसुधारक होते. त्याच मताचे त्यांचे इतर सेही आगरकरांचे अनुयायी होते. त्याकाळी हरीभाऊ आपटे, आण्णासाहेब कर्वे, रावसाहेब आणि काशोबाई कानिटकर अशी मंडळी डॉक्टरांचे घरी येत असत. जेवणाच्या वेळी त्यांच्या गप्पांमधून समाजातील रूढींवर टीका होत असे; त्याचबरोबर स्त्रीशिक्षण, विधवा विवाह अशा विषयांवर चर्चा देखील होई. लहान वयात शंकरभाऊंना जुन्या गोष्टी टाकून देऊन सुधारणा व्हायला हवी,' एवढाच ढोबळ सारांश समजत असणार.

शंकरभाऊंच्या आईनी सोलापुरातील काही ख्रियांना गोळा करून शिवण, विणकाम, या गोष्टीबरोबर अक्षरओळख करून देण्याची सोय केली होती. तेथे आईबरोबर जाणाऱ्या छोट्या शंकरलाही शिक्षणाचा पहिला धडा मिळाला. समजू लागल्यावर शंकरचे नाव तीन नंबरच्या म्युनिसिपल मराठी शाळेत घालण्यात आले; पण घरातील विविध चर्चा ऐकल्यामुळे त्याची समज खूपच वाढली होतो.

रियासतकार सरदेसाई सोलापूरच्या घरी आले म्हणजे इतिहासातील स्फूर्तिदायक गोष्टींची मेजवानीच मिळे. पंडित श्री. दा. सातवळेकर आले म्हणजे शंकरला फार हर्ष होई. कारण, बाबांच्या कारखान्यात जे फराळाचे डबे, गरम झरा अशा वस्तू निर्माण होत, त्याची चित्रे ते भराभर काढून देत आणि संध्याकाळी सिद्धेधराचे देऊळ, किल्ला किंवा मोतीबाग येथे जाऊन जलरंगाने सुंदर निसर्ग चित्रे काढीत. शंकर ते डोळ्यात प्राण आणून पहात असे. सातवळेकरांचे आर्ट स्कूल पाहण्यासाठी ७ वर्षाच्या शंकरला ते एकदा आपल्याबरोबर मुंबईला घेऊन गेले. मुंबईत आल्यावर घोड्याच्या ट्रॅम्स, गॅसचे दिवे, राणीचा बाग, राजाभाई टॉवर, चौपाटी अशो प्रेक्षणीय स्थळे शंकरने पाहिलो, तरी आर्ट स्कूल व त्यातील चित्रे यांचा शंकरच्या मनावरील पगडा केव्हाही पुसट होऊ शकला नाही.

लहानपणी आईबरोबर आजोळी जाण्याची संधी शंकरला मिळे. त्याकाळी कर्नाटकातील बम्मनहळ्ळीला जायचे म्हणजे हुबळीहून पुढचा प्रवास खटारगाडीने दोन टप्प्यांत करावा लागे. आजूबाजूचा भाग डोंगराळ आणि जंगलाचा, त्यात वाघ, रानडुक्करे, चित्ते असे जंगली प्राणी असत; पण आजोळच्या टेंबे घराण्यातील सर्व मामा मोठे धाडसी शिकारी होते. त्यांच्या शिकारीच्या गाष्टी ऐकताना शंकरचे मन थरारून जायचे आणि आपणही अशा काही धाडसाच्या गोष्टी कराव्या अशी त्याला इच्छा व्हायची. जंगलातून येणाऱ्या प्राण्यांच्या विविध आवाजांनी शंकरची घाबरगुंडी उडे; पण मनावर एक जादूही घातली जाई. माणसाला निर्भय बनविण्यास साहसाची आवड निर्माण करणारे लहानपणचे अनुभव बरेच परिणामकारक होत असावेत.
१८९६ साली सोलापुरात ब महाराष्ट्र-कर्नाटकाच्या भागात मोठा दुष्काळ पडला. हजारो लोक तडफडून मेले, अशा घरांतील एकाकी मुलींना लक्ष्मीबाईंनी सरस्वतीमंदीर या त्यांच्या संस्थेत आणले आणि त्यांच्या अन्नपाण्यासाठी झोळी घेऊन धान्याचे दुकानदार व नागरिकांकडे धान्याचा मुष्टिफेड मागण्याचे काम त्यांनी केले. तेवढ्यात प्लेगची साथ सोलापुरात पसरू लागली. लोक पटापट मरू लागले. गावाबाहेर झोपड्या घालून लोक तिथे राह्यला गेले; पण तेथे चोऱ्या होऊ लागल्या. रात्रभर आरडाओरडा चाले. १८९८ मध्ये शंकरची मुंज व मोठी बहीण कृष्णाचे लग्न सोलापूर नजिक असलेल्या कडबगाव स्टेशनच्या पिछाडीस उरकण्यात आले.

किर्लोस्कर व सरदेसाई या दोन्ही घरची मंडळी सुसंस्कृत व उदारमतवादी असल्याने, सर्वांना हा आडबाजुचा समारंभ चांगला वाटला. त्यावेळी एका सकाळी खग्रास सूर्यग्रहण लागले होते. काही क्षण रात्रीसारखा गडद अंधार पसरला. तारे चमक लागले. शंकरभाऊंच्या बाबांनी सर्वांना गच्चीवर नेऊन ग्रहण म्हणजे काय? ते कसे लागते? याची शास्त्रोक्त माहिती दिली. पृथ्वी व चंद्र सतत फिरत असतात. पृथ्वी व सूर्याच्या मध्ये चंद्र आला म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांना सूर्य दिसत नाही; त्याला सूर्यग्रहण म्हणतात. समाजातील अज्ञानामुळे अंधश्रद्धेचा लोकांच्या मनावर किती जबरदस्त पगडा आहे, म्हणूनच सर्वसाधारण जनतेच्या दृष्टीने हा केतू ग्रहाचा प्रभाव आहे असेच त्यांना वाटते हे शंकरच्या लक्षात आले.

बाबांना संगीताची देखील बरीच आवड होती. ते स्वत: सतार वाजवीत. आपल्या घरातील मुलांना सर्व कलांची ओळख व्हावी म्हणून सतार शिकविण्यास अडव्यप्पा या कानडी शिक्षकाची त्यांनी नेमणूक केली होती. त्यांच्या तालमीत ''दा दोडदादा'' करायला व दोन-चार राग ओळखायला शिकल्यावर, शंकरच्या संगीताचा अभ्यास बंद पडला.

लहानपणी असे संस्कार मिळणे ही शंकरच्या दृष्टीने खरोखर मोठी भाग्याची गोष्ट ठरली. वर्गातील इतर मुलांपेक्षा आपण बरेच निराळे आहो, हे शंकरच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. इतर विद्यार्थ्यांना शंकर हा एक विचित्र प्राणी वाटे, तर त्यांचा अडाणीपणा पाहून शंकरला त्यांची कीव येई व त्यांच्या चुकीच्या कल्पना दूर करण्यासाठी त्याची सारखी धडपड असे. मित्रांच्या अडाणी समजुती दूर करायचे एक काम, तर त्यांच्यात देशभक्तीचे वारे भरायचे दुसरे काम, शंकरला करायचे होते. घरात वडील मंडळींची जी बोलणी चालत त्यावरून परदेशातून आलेले इंग्रज लोक आपल्यावर राज्य करतात हा एक मोठा जुलूम आहे हे शंकरला समजले. म्हणून, इतर मुलांना आपल्या देशाच्या स्थितीची नीट कल्पना यावी, निदान शिवाजी महाराजांचो तरी माहिती द्यावी हे अज्ञान दूर करण्याकरिता शंकर स्वत: वाचलेल्या शिवाजीच्या गोष्टी मित्रांना सांगत राही. आपल्या मित्रसेनेला देशभक्तीचे धडे द्यायला सोलापूरचा जुना किल्ला हे एक हवेतसे ठिकाण लाभले होते. तेथे येताच शंकरला इतिहासकाळात शिरल्यासारखे वाटे. शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांचा त्यां मुलांच्या अंगात संचार होई. त्या भरात हरहर महादेव अशी गर्जना करीत ते एक-एक बुरूज काबीज करीत असत.


देशाचे स्वातंत्रय कसे मिळवायचे ह्या एकाच विचारामुळे त्या मुलांना वेळेचे भान राहत नसे. पण हे रणक्षेत्र घरात आले-म्हणजे घरातल्या वस्तूंची मोडतोड होऊ लागे. मग त्या मावळ्यांना घरातून बाहेर पिटाळले जाई. शंकर चौथीत गेल्यावर इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला आणि बादशहा सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहणाचा समारंभ शाळेतही करण्याचे ठरले. त्यासाठी मास्तरांनी 'भो राजन्‌ धन्य धन्य विबुधमान्य सार्वभौम भूवरा' असे गाणे सर्वांना शाळा चालकांनी म्हणायला सांगितले; पण शंकरला ते गाणे नादानपणाचे लक्षण वाटले. असे म्हटल्यावर त्याला मास्तरांच्या छड्या खाव्या लागल्या. सुट्टीत बोरोटी या खेड्यातील नातलगांकडे शंकरला पाठवण्यात आले. शेतावर पाखरांना हाकायचा उद्योग त्याला मिळाला. गोफणीतून धोंडा मारायची कला तो चांगली शिकला. एका झाडावर फुटक्या मडक्याचे निशाण लावून त्यावर मारा करायची कल्पना त्याला सुचली, पण शंकरच्या गोफणीतून निघालेला एक दगड पाटलाच्या मुलाला लागल्यावर, त्याची गोफण जप्त झाली.

एकदा सोलापुरात छत्र्यांची सर्कस आली होती. शंकरने ती पाहिली तेव्हां आपणच सर्कस करण्याचा विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला. त्याने दोन कुत्री, एक शेळी पकडून आणली. सतारीची गवसणी काढून, एका मुलाच्या तोंडाला सोंड म्हणून बांधून त्याला हत्ती बनवला. दोघे कोलांट्या उड्या मारू लागले. आता आपल्या पायावर दुसऱ्या मुलाला उभे करायचे काम फक्त राहिले. ते काम करण्यासाठी शंकर आडवा झाला. घरातील अंबुताईचा दोन-तीन वर्षाचा मुलगा दोन मुलांनी उचलून आणून शंकरच्या पायावर उभा केला; पण दुसऱ्याच क्षणी त्याचा तोल जाऊन, तो जमिनीवर कोसळून त्याने एक जोराची किंकाळी ठोकली.

शंकरवर गहजब करायला हे सर्वांना चांगले निमित्त झाले. शंकरच्या अशा हूडपणाला घरातील सर्व मंडळी कंटाळली. त्याचवेळी बेळगावचे काका रामूअण्णा घरी आले होते. त्यांना बाबा म्हणाले, ''रामूअण्णा! तुला खोडकर मुलांना कसं सुधाराव हे चांगलं माहित आहे, तेव्हा तू शंकरला आपल्याकडे घेऊन जा नि तुझा मुलगा कालिदास याला माझ्याकडे पाठवून दे!''

भाऊ-बहिणी, शाळेतील गल्लीतील सारे दोस्त यांना सोडून जायचे शंकरला अवघड झाले. 'माझी रवानगी कशासाठी? मुलांच्या सुधारणेसाठी मी किती झटतो. त्यांना चांगल्या गोष्टी सांगतो, मी खोटे बोलतो काय? मी वाईट आहे काय?' असे प्रश्न शंकरला सतावू लागले. त्याच गोंधळलेल्या मन:स्थितीत शंकर काकांच्याबरोबर बेळगावला जायला निघाला. मोठे काका रामुअण्णा यांच्याबरोबर बेळगावला रात्री घरी पोचल्यावर काकूंना नमस्कार करून शंकर गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर बाहेर पाहिले तर सगळीकडे पांढरे फटफटीत धुके पसरलेले शंकरला पहिल्यांदाच दिसले. ते हळूहळू विरळ होत सूर्य वर येऊ लागला. लौकरच स्वच्छ ऊन पडले आणि सगळीकडे पसरलेला दंवबिंदूंच्या मोत्यांचा सडा पाहून त्याला गंमत वाटली. सोलापूरला अशी गंमत कधी दिसली नव्हती.

काकांचे घर झोपडीवजा कौलारू होते. काही अंतरावर त्यासारखीच सात-आठ घरे होती. हीच माळावरची वस्ती. घरातील दोन भावंडे त्याच्यापेक्षा लहानच होती. मागे जांभेकरांची व धाकट्या लक्ष्मणकाकांचीही झोपडी होती. काकांच्याकडे एक कुत्र्याचे पिल्लू होते. त्याची शंकरशी गट्टी जमली. संध्याकाळी थोडे हिंडून यावे म्हणून शंकर मोत्याला घेऊन बाहेर पडला. जरा अंतरावर काही खोपटी दिसली. लंगोट्या घातलेली मुले तेथे विटी-दांडू खेळत होती. शंकरने त्यांना विचारले, ''मला घेता का तुमच्याबरोबर खेळायला?'' तो प्रश्न एकून ती आश्चर्यान पाहतच राहिली. त्यातला एक धीट पोरगा म्हणाला, '' आम्ही घेऊ, पण आम्ही न्हाव्याची मुले आहोत, तुम्हाला शिवाशिव नाही का होणार?'' शंकर जरा थांबून म्हणाला, ''ते पुढे पाहू. मला आज तरी खेळायला घ्या.'' आणि दांडू घेऊन तो विटी कोलायला लागला. या खेळात त्याचा हात बसलेला होता. झुलावर झुला चढू लागला ते दिसताच पोर त्याच्याकडे आदराने पाहू लागली आणि त्यांनी शंकरला फिरून खेळायला यायला सांगितले.

घरी आल्यावर हो हकोगत शंकरने काकांना सांगितली. ते म्हणाल, ''त्या मुलांबरोबर खळायला तुला हरकत नाही. ही न्हावी मंडळी आपल्यासारखीच प्लेगसाठी या माळावर राह्यला आली आहेत. मात्र खेळून आल्यावर हात-पाय धुवायला विसरू नकोस. तुझ्यासाठी मुकटा आणला आहे. ता जेवताना नेसायचा हे लक्षात ठेव. रात्री जेवण झाल्यावर घरातील सर्व मंडळी रामरक्षा, शिवस्तोत्र, चर्पटपंजरी अशो स्तोत्र म्हणावयाची. ती पाठ करण्यास शंकरला वेळ लागला नाही. काकांची शिस्त फार. नीटनेटकंपणाची त्यांना फार आवड. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथ ठेवायला हवी. स्वभावही फार प्रेमळ. लहान मुलावर ते रागावत नसत त्यांनी खोड्या अथवा दंगा केला, तर ते मुलांच्या वयाला शोभलस आहे असं त्यांचे मत.
झोपडीपासून बेळगांवचे सरदार्स हायस्कूल तीन मैल दूर, म्हणून काकांनी शंकरसाठी एक छोटी सायकल आणून दिली. तिच्यावर बसायला यंऊ लागताच शंकरला पंख फुटल्यासारख वाटू लागले. ''शंकर! तुला आणखी काय हव?'' असं काकांनी विचारल्यावर त्याने रंपटी आणि एअरगन अशा दोन गोष्टी सांगितल्या. त्याही काकांनी आणून दिल्यावर शंकरच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काकांच्याबरोबर शंकर शाळेत जाऊ लागला. इंग्लिश भाषा शिकवावी तर ती काकांनीच असे त्याला वाटायच. घरी ते पालक व शाळेत शिक्षक; त्यांच्या मार्गदर्शनाचा शंकरला दुहेरी लाभ झाला. मुलांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाला योग्य वाव मिळाला, तर ती भलत्या मार्गाला लागणार नाहीत हा काकांचा विश्वास. एका सणाला काकुंनी जेवायला साखरभात केला. शंकरचा हा आवडता पदार्थ. तो पुन्हा पुन्हा मागू लागला. काकु रागवल्या. त्यावर काका म्हणाले. *'शंकरवर अशो रागावू नकोस. त्याला साखरभात इतका आवडतो, तर रोज त्याच्यापुरता थोडा करीत जा!'' शंकरला वाटल, काका त्याची थट्टा करत आहेत; पण दुसर्‍या दिवशी फिरून पानात साखरभात आल्यावर तो खूष झाला. मात्र पुढे चार-पाच दिवस साखरभातच खाण्याची पाळी आल्यावर तो दृष्टीस नकोसा झाला.

''एखाद्या गोष्टीबद्दल जास्त हावरटपणा करू नये.'' असे काकांनी शंकरला तोंडाने सांगितले नाहो; पण त्या अनुभवाने शंकरला जो धडा दिला, तो जन्मभर त्याच्या लक्षात राहिला. शंकर हायस्कूलला जाऊ लागला. त्याला चित्रे काढायला येतात हे पाहून त्याचे ड्रॉईंग मास्तर हरीभाऊ फडके त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले आणि त्याची तयारी पुरी होताच त्यांनी शंकरला आर्ट स्कूलच्या थर्ड ग्रेडच्या परीक्षेस बसवल शंकर तो परीक्षा चांगल्या प्रकारे पास झाला. झोपड्यांतील पोरांचा शंकर म्होरक्‍या झाला होता. शाळा सुटली की सायकलवरून तो घरी येई. तथ बाळू, बिडू, दादू, विठू असे सारेजण त्याची वाटच पाहत असत. मग खेळाला रंग भरायला काय उशोर? त्यात शंकर आपली एअर गन खांद्यावर घेऊन बाहेर पडला म्हणज सरडे, खारी, चिमण्या असली कशाची तरी शिकार केल्याशिवाय माघारी परतत नसे. हा त्याचा शिकारीचा छंद सर्वांनाच आवडत असे. एक दिवस डोंगराकडे निघाल्यावर थोड्या अंतरावर एक भला मोठा साप रमत गमत चाललेला दिसला. लहान साप पाहिले होत, पण हे प्रकरण वेगळेच होते. आता काय करायचं? साहसाचा प्रसंग आला तर धैर्याने पुढे झाले पाहिजे म्हणून शंकरने मुलांना थांबवून माळावरचे दगड गोळा करायला सागितले, तेवढ्यात साप झपाट्याने पुढे निघाला ब एका खड्ड्यात दडला. मग साऱ्या जणांनी खड्ड्याच्या काठावरून सापावर दगडांचा मार सुरू कला. त्यापुढे त्याचा काय निभाव लागणार? सर्वांनी त्याला ठेचून मारून टाकले आणि त्याला एका काठीवर टाकून उत्साहाने घरी आणल. हे पाहून काकानी शंकरची खूप पाठ थोपटली. त्यामुळे साऱ्या पोरांना अवसान चढले.

शंकरचे धाकटे काका लक्ष्मणराव मुंबईस आपला छोटा कारखाना चालवीत काकांनी मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटची नोकरी सोडली होती. शिवाय मुंबईसही प्लेगचो साथ सुरू झाली, म्हणून त्यानी आपला उद्योग बेळगावास हलवला होता. तेथे शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणारी यंत्रे तयार करीत. विहिरीचे पाणी काढण्यासाठी ते पवनचक्क्या करू लागले तसंच, बैलांना देण्याचा कडबा कापून घातला तर अधिक चांगला हे लक्षात घेऊन त्यांनी कडबा कापण्याचे यंत्र बनविले. त्याचा प्रसार होण्यासाठी परिणामकारक जाहिरात व्हायला पाहिजे असं काकाचे बोलणे ऐकल्यावर शंकरने माळावर जाऊन दोन बैलांचे चित्र काढले. एक रोडका व दुसरा धष्टपृष्ट आणि खाली बैलांचा संवाद

'कार खंद्याबा, आताशी तुझी चैन दिसत लै!
कसा तयार झालास अक्शो?
असं तुला खायला तरी काय घालतात? ''
''डफळ्याबा, आताशी किनई
लै ब्येस खायला गावतय.
अमच्या धन्यानं बेळगावहून
किर्लोस्कर बंधूचे कडबा कापण्याचे यंत्र आणलयं.
ते लै नामी हाय बघ.
त्यातून कडबा कसा करारा भुसा होऊन पडतू या.
त्यावर जरास मिठाचं पाणी मारलं
की एवढसं खाल्ला की पोटच भरतय!
जिवाला कसं गोड वाटतयं!
सांग की, लेका! तुझ्या धन्याला!
तसलं एक यंतूर आणायला.''

बारा वर्षांच्या शंकरने केलेली ही जाहिरात पाहून काका शंकरच्या चित्रावर फार खूष झाले आणि त्यांनी त्याला उत्तेजन देण्यासाठी क्लिटो कॅमेरा आणून दिला.

Hits: 82
X

Right Click

No right click