१४. सायंकाळी रानांत चुकलेले कोकरूं

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

१४. सायंकाळी रानांत चुकलेले कोकरूं

(जाति : नृपममता)
(चाल - “नृपममता रामावरती' सारखी)

कां भटकसि येथें बोलें ? कां नेत्र जाहले ओले ?
कोणिं कां तुला दुखवीलें ? सांगरे ॥१॥

धनि तुझा क्रूर कीं भारी । का माता रागें भरली ?
का तुझ्यापासुनी चुकली ? सांगरे॥ २॥

हा हाय कोंकरूं बचडें ! किति बें बें करुनी अरडे
अुचलोनि घेतलें कडे | गोजिरें ॥ ३ ॥

कां तडफड आतां करिसी ? मीं कडे घेतलें तुजसी
चल गृहीं चैन मग खाशी । अकरे ॥ ४ ॥

मी क्रूर तुला का वाटे ? हृदय हें म्हणुनि का फाटे ?
भय नको तुला हें खोटें अकरे ॥५॥

हा चंद्र रम्य जरि आहे । मध्यान रात्रिमधिं पाहे
वृक वारुनि रक्षिलना हें । जाणरे ॥ ६ ॥

तो दूर दिसतसे कोण ? टपतसे क्रूर बघ यवन
गोजिरी कापण्या मान | जाणरे॥॥ ७॥

कमि कांहिं न तुजलागोनी । मी तुला दूध पाजोनी
ही रात्र गृहीं ठेवोनी । पुढति रे ॥ ८ ॥

उदओऔक येथ तव माता । आणीक कळपिं तव पाता
देऔन तयांचे हातां । तुजसि रे॥ ९ ॥।

मग थोपटुनी म्यां हातें । आणिलें गृहातें त्यातें
तों नवल मंडळींना तें । जाहलें ॥ १०॥

कुरवाळिति कोणी त्यातें । अणि घेति चुंबना कुणि ते
कुणि अरसिक मजला हंसते । जाहले ॥। ११ ॥

गोजिरें कोंकरूं काळें । नअ दहा दिनांचें सगळें
मअुमअू केश ते कुरळे | शोभले ।। १२ ॥

लाडक्या कां असा भीसी । मी तत्पर तव सेवेसी
कोंवळी मेथि ना खासी | कां बरें ॥ १३ ॥

बघ येथें तुझियासाठीं । आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी । कां बरें ॥ १४ ॥

तव माता क्षणभर चुकली । म्हणुनि का तनू तव सुकली
माझीही माता नेली । यम करें ॥ १५ ||

भेटेल अुद्यांतव तुजला । मिळणार न परि मम मजला
कल्पांतकाल जरि आला | हायरे ॥ १६ ॥

मिथ्या हा सर्व पसारा । हा व्याप नधरचि सारा
ममताही करिते मारा | वरति रे॥ १७ ॥

ह्या जगीं दुःखमय सारें । हीं बांधव पत्नी पोरें
म्हणुनियां शांतमय हो रे । तूं त्वरे ॥ १८ ॥

तरि कांहिं न जेव्हां खाई । धरुनियां अुग्रता कांही
उचटिलें तोंड मीं पाही । चिमुकले ॥ १९ ॥

हळु दूध थोडकें प्यालें । मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरूं बावरून गेलें । साजिरें॥ २० ॥

स्वातंत्र्य जयांचें गेलें । परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनी सुख न त्यां कसले | कीं खरें ॥ २१ ॥

लटकून छातिशीं निजले । तासही भराभर गेले
विध हें मुदित मग केलें । रविकरें॥॥| २२॥

घेअुनी परत त्या हातीं । कुरवाळित वरचेवरती
कालच्या ठिकाणावरती | सोडिलें ॥ २३ ॥

तों माता त्याची होती । शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे तरूंचे पाठीं । हाय रे ॥ २४ ॥

हंबरडे ऐकूं आले । आनंदसिंधु असळले
स्तनिं शरासारखें घुसलें । किति त्वरें ॥ २५ ॥

डोलतो मुदित तरुवर तो । सप्रेम पक्षि हा गातो
तोकडा प्रतिध्वनि देतो । मुदभरें॥ २६ ॥

हे प्रभो हर्षविसि यासी । परि मला रडत बसवीसी
मम माता कां लपविसी । अजुनि रे।॥| २७॥

- नाशिक, १९००

/p>

Hits: 112
X

Right Click

No right click