१५. नारोशंकराचें देवालय १६. गोदातटीं रात्रीं
Parent Category: मराठी पुस्तके
Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता
Written by सौ. शुभांगी रानडे
१५. नारोशंकराचें देवालय
(शार्दूलविक्रीडित)
दिल्लीचे पद हालवोनि वरिली तेजें जिंहीं संपदा ।
राहोनी निरपेक्ष वाहुनि दिली श्रीशंभुच्या सं-पदां ॥
होते ते तुमचे सुपूर्वज असे यत्कीर्तितें ना लय ।
नारोशंकरचें असें कथितसें आम्हांसि देवालय ॥
- नाशिक, १९००
१६. गोदातटीं रात्रीं
(आर्या-गीति)
गंगातीरीं बिंबित दीपशिखा नचि परंतु कज्ज्वळ तें ।
सज़नहृदय असेंची त्यजुनी दोषा गुणाकडे वळतें ॥
- नाशिक, १९००
Hits: 112