१३. दिवंगत मित्राच्या पत्नीने सांत्वन

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

१३. दिवंगत मित्राच्या पत्नीने सांत्वन
(आर्या - गीति)

कुलजे सुभगे माझा गे आशीर्वाद तुजसि हा पावो ॥
मन्मित्रपत्नि तूं तव कार्यक्षमता सुकीर्ति जन गावो ॥ १ ॥

आकाश फाटलें तरि ठिगळानें त्यास केविं झाकांवें ।॥
धैर्यालंबन करूनी कर्मगतिपुढे मुकेचि वांकावे ॥ २ ॥

आपुल्यापरिसहि गुरुतर संकटग्रस्तास पाहुनी समजा ॥
व्हा शांत हृदय ह्या शांतिसम दुजी न संकटांत मजा ॥३ ॥

धनसंबंधीं ठेवा विधास न, हें भल्यास लोभवितें ॥
सद्‌वर्तन शुचि राहो कीं हें कुलजांस फार शोभवितें ॥४ ॥

लेखनवाचन अपणां येतें हें फार फार बरवेंची ॥
सद्‌ग्रंथकनक कणकण संतत व्हायास तूं गवर वेंचीं ॥ ५ ॥

आशीर्वाद असे त्या बाबूला आणि अुभय कन्यांना ॥
कीं सद्द्याश्रीधी पावाया ना म्हणोत धन्याना ॥६ ॥

त्वल्निखित अु॒त्तराते धाडी वृत्तांत त्यांत कळवावा ॥
वळवावा श्रीश मनें स्वकुलाचा कीर्तिपट न मळवावा ॥७ ॥
(१८९९- १९००)

Hits: 112
X

Right Click

No right click