पंजाबी भाषा

Parent Category: भाषांतर Category: इतर भारतीय भाषा Written by सौ. शुभांगी रानडे

Following article is small part of language information article. Pleae refer to https://vishwakosh.marathi.gov.in for font images, complete article and info about literature in this language.

भारतातील पंजाबचे राज्य व पाकिस्तानातील पंजाबचा प्रांत येथील मुख्य भाषा पंजाबी ही आहे. तिच्या एकंदर भाषिकांची संख्या जवळजवळ तीन कोटी आहे. तिच्या भारतातील पोटभाषा अमृतसरची मझी, जलंदर व होशियारपूरची दोआबी, लुधियानाची मलवी, पतियाळा व संग्रूरची पत्यावली, जम्मूची डोग्री, चंबा व मंडीची पहाडी या असून, तिच्या पाकिस्तानातल्या पोटभाषा ल्यालपूरची ल्यालपुरी (लयलापुरी), मुलतानची मुलतानी, हिस्सारची हिंडको आणि रावळपिंडीची पोथोहारी या आहेत.

पंजाबी भाषा ⇨ गुरुमुखी लिपीचा उपयोग करते. मुसलमान लोक मात्र ⇨ अरबी लिपी वापरतात.

पंजाबी ही इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील इंडो-आर्यन भाषा असून तिचा प्रारंभकाल इ. स. अकराव्या शतकापासून आहे. प्रारंभीच्या काळातील प्रमाणलेखन मुलतानी बोलीत असून फरीद पहिला, इब्राहिम कमाल, गोरखनाथ, चर्पटी, चांद व खुसरौ हे त्या काळातले प्रमुख लेखक होते.

पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत मध्ययुगीन पंजाबीचा काळ आहे. हा गुरू नानककाल म्हटला जातो. हे पंजाबी साहित्याचे सुवर्णयुग होय. याच काळात गुरू अर्जुनदेव यांनी शीख धर्मग्रंथ आदिग्रंथ [⇨ ग्रंथसाहिब] याचे संपादन केले. या आदिग्रंथात गुरू नानक, अंगद, अमरदास, रामदास आणि अर्जुनदेव यांची धर्मपर रचना आणि गुरू गोविंदसिंगांचा एक दोहा आहे. शिवाय कबीर, फरीद, नामदेव इ. हिंदू व मुसलमान संतांच्याही काही रचना त्यात आहेत. लाहोरचा मुसलमान सूफी कवी शाह हुसेन हा या काळातलाच आहे.

मध्यकालीन पंजाबीचा काळ यापुढे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंतचा आहे. या काळातील मुसलमान लेखकांच्या ललित साहित्यामुळे पंजाबीत अनेक फार्सी व अरबी शब्द आले. हिंदू व शीख लेखक धार्मिक लेखनाकडे वळलेले असून त्यांच्या भाषेवर संस्कृतची छाप दिसून येते. अमृतसरच्या बोलीवर आधारलेली ही भाषा साधभाख (साधुभाषा) म्हणून ओळखली जाते. अर्वाचीन पंजाबी लेखन पाश्चात्त्य विशेषतः इंग्रजी साहित्याच्या प्रभावाखाली आहे.

क्रियापदाचे वर्तमानकालवाचक धातुसाधित धातू व्यंजनान्त असल्यास दा हा प्रत्यव लावून आणि स्वरान्त असल्यास न्दा हा प्रत्यय लावून होते. या धातुसाधितानंतर हो ची वर्तमानकाळाची रूपे आली, की क्रियापदाचा वर्तमानकाळ सिद्ध होतो : जा ‘जा’ – वकाधा जान्दा कर ‘कर’ – वकाधा कर्दा. वर्तमानकाळ : मॅ जान्दा आं ‘मी जातो’ मॅ कर्दा आं ‘मी करतो’ इत्यादी.

वकाधानंतर हो ची भूतकाळाची रूपे आली की रीतिभूतकाळ होतो : मॅ जान्दा सां ‘मी जात होतो, मी जायचो’ इत्यादी. याचे नकारार्थी रूप कर्त्यानंतर नैं हे अव्यय वापरून आणि मुख्य व सहायक क्रियापदांची उलटापालट करून मिळते :  मॅ नैं सांजान्दा ‘मी जात नव्हतो’. 

चालू वर्तमानकाळ पुढीलप्रमाणे : मॅ जा रिआ वांमॅ जा रइ आं  ‘मी जातो आहे – मी जाते आहे’ इत्यादी. 

चालू भूतकाळ पुढीलप्रमाणे : मॅ जा रिआ सांमॅ जा रइ सां ‘मी जात होतो – मी जात होते’.

भविष्यकाळ : मॅ बोलांगामॅ बोलांगी  ‘मी बोलीन’.

स्वरान्त धातूंना आंगा हा प्रत्यय लागण्यापूर्वी लागतो : मॅ जावांगा – मॅ जावांगी  ‘मी जाईन’.

प्रत्ययरहित धातू हे आज्ञार्थाचे एकवचनाचे रूप असून धातूला हा प्रत्यय लागून त्याचे अनेकवचन होते : जा – जाओ ‘जा’ दे-द्यो ‘दे – द्या’.

काही वाक्ये : एथे पंजाबी बोली जांदी ए  ‘इथे पंजाबी बोलली जाते’. पांडा टुट्टा  ‘भांडं फुटलं’. मुंडेने कुत्तेनुं मारिआ ‘मुलाने कुत्र्याला मारलं’. ओने सानुं कलम दे दित्ता ‘त्यांनी आम्हाला पेन दिलं’. जे तुसीं ओनुं माफ कर्दे, तां चंगा हुंदा ‘ जर तू त्याला क्षमा केली असतीस, तर बरं झालं असतं’. मनुं पता हुंदा, तां दुजी वारी ना जांदा ‘मला माहीत असतं, तर मी दुसऱ्या वेळेला गेलो नसतो’.

संदर्भ :1. Gill, H.S. Gleason (Jr.), H.A. A Reference Grammar of Punjab, Hartford, 1962.

    2. Shackle, C. Punjabi, London,  1972.

कार्लेकर, ना. गो.

Hits: 190
X

Right Click

No right click