मराठी व इंग्रजीतून नेटद्वारे प्रशिक्षण वर्ग

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे
कोरोना स्थानबद्धतेमुळे अनेक लोकांचे शिक्षण व व्यवसाय यात व्यत्यय आला आहे. सध्या वेबिनारसारखे कार्यक्रम बहुतेक महाविद्यालये घेत आहेत. मात्र त्याचा उद्देश शिक्षणाऐवजी प्रसिद्धी असल्याचे आढळून येते. ज्यांना एखादा विषय वा कौशल्य यात पारंगत व्हायचे असेल त्यांना शिक्षकाकडून दररोज नियमित तास शिक्षण, स्वयंअभ्यास, चर्चा, परीक्षा, प्रकल्प स्वतः करणे या सर्व टप्प्यांतून जावे लागते. शिवाय दिवसातील आठ तास त्या विषयावर गृहपाठ वा प्रत्यक्ष काम करावे लागते.

Learn from home

या सर्वांचा समावेश करून ज्ञानदीप फौंडेशन नवे सुधारित  पण निरंतर नियंत्रण असणारे प्रभावी प्रशिक्षण वर्ग वेबडिझाईन, फोटोशॉप व पायथॉन व इतर प्रोग्रॅमिंग विषयांसाठी तसेच पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण या विषयांवर  ज्ञानदीपच्या विजय.नगर येथील ऑफिसमध्ये सुरू केले आहेत. यासाठी ठराविक शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागेल. ज्ञानदीप फौंडेशन परीक्षा घेऊन आणि प्रकल्प तपासून नंतरच प्रमाणपत्र देईल.

याशिवाय ज्ञानदीप संगणक हाताळणी, इंग्रजी - मराठी टंकलेखन, फोटोशॉप, ब्लॉग लिहिणे, वेबडिझाईन, तसेच पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण या विषयांवर  नेटद्वारे प्रशिक्षण वर्ग सुरू करीत आहे. घरबसल्या आपल्या फावल्या वेळात हे कोर्सेस करून स्वत:च्या नव्या व्यवसायाची सुरुवात करा वा ज्ञानदीपच्या परिवारात सामील होऊन उद्योगी बना.

हे प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याचा उद्देश ज्यांना या क्षेत्रात नोकरी वा स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे अशांसाठीच आहेत. त्यामुळे हे प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देण्याची तयारी असणार्‍यांनीच या कोर्ससाठी नावे नोंदवावीत.
 
विषयातील धड्यांची आखणी क्रमवार केलेली असून धड्यातील माहितीचे पूर्ण आकलन झाले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी पूरक प्रश्नावली व गृहपाठ पूर्ण करणे अनिवार्य राहील.

 गृहपाठासाठी दिलेली सर्व उदाहरणे स्वतः सोडवून ज्ञानदीपकडे तपासण्यासाठी पाठवावी लागतील. अर्थात त्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही. आपल्या फुरसतीच्या वेळेत कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यास आपल्या सवडीप्रमाणे गृहपाठ पूर्ण करता येतील मात्र सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आल्यानंतरच पुढील धडा देण्यात येईल. साहजिकच कोर्ससाठी शेवटी वेगळी परीक्षा असणार नाही.

कोर्स समाप्तीनंतर ज्ञानदीप फौंडेशन तर्फे कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीचे सर्टिफिकेट आवश्यक असल्यास वेगळे परीक्षाशुल्क भरून त्यांच्या ऑनलाईन परिक्षेत पास व्हावे लागेल.

प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतःचा ब्लॉग, ट्विटर अकौंट सुरू करून आपली प्रगती व स्वतःचे लेख प्रसिद्ध करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच सार्वत्रिक उपयोगाच्या लेखांना ज्ञानदीपच्या वेबसाईटवर प्रसिद्धी देण्यात येईल.
 
या ऑनलाईन कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी इमेलने.(This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.) संपर्क साधा.- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Hits: 365
X

Right Click

No right click