वेबडिझाईन स्पर्धा - २०२३

Parent Category: ROOT

मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण डिजिटल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानदीपचा उपक्रम

मराठी संगणक साक्षरता अभियानात विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोंबर २०२३ या महात्मा गांधीजयंती निमित्त्त ज्ञानदीप फौंडेशन एक अभिनव वेबडिझाईन स्पर्धा जाहीर करीत आहे.( ज्ञानदीपच्या संस्थापक कै. सौ. शुभांगी रानडे याचीही जन्मतारीख २ ऑक्टोबर आहे.)

या स्पर्धेत भाग घेणा-या प्रत्येकास मराठी टायपिंग आणि वेबडिझाईन या वेबसाईटच्या माध्यमातून शिकविले जाईल. २ ऑक्टोबर ते १ डिसेंबरपर्यंत या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मराठी टायपिंग, एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट व फोटोशॉप व्हिडिओच्या माध्यामातून शिकविले जाईल तसेच त्याच्या कल्पनेप्रमाणे कोणत्याही विषयावर एक वेबसाईट तयार करून घेण्यात य़ेईल व ती त्यांच्या नावाने मायमराठी या ज्ञानदीपच्या मुख्य वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ३१ डिसेंबरपर्यंत प्रेक्षकांना या वेबसाईटचे परिक्षण करून १०० पैकी गुण देता येतील.

गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना रु. ५००० , रु. ३००० आणि रु. २००० अशी बक्षिसे दिली जातील.

स्पर्धेच्या अटी
१. ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यासाठी आहे.
२. प्रवेश शुल्क - रू. ५००
३. विद्यार्य़्यानी प्रशिक्षण काळातील सर्व चाचणी परीक्षा व गृहपाठ ठराविक वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

संपर्क :
ज्ञानदीप फौंडेशन, सांगली
Email - This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
Mob. - +91 9422410520


प्रवेश शुल्क भरावयाची माहिती




X

Right Click

No right click