आपल्या शिक्षणसंस्थेची गौरवगाथा
शिक्षणसंस्था या समाजाच्या मानबिंदू असतात. प्रत्येक लहान मोठ्या शहरात अशा अनेक ध्येयवादी संस्था आपल्या निरलस कार्याने नावारुपास आलेल्या आहेत. परिस्थितीतील बदलांमुळे यापैकी काही संस्थांचा इतिहास गौरवशाली असला तरी सध्याची स्थिती आर्थिक अडचणीमुळे बिकट बनलेली असून संस्था पुढे चालविणेही त्यांना अवघड जात आहे.
याउलट यापैकीच काही संस्थांनी आपल्या कुशल व्यवस्थापनाच्या जोरावर संस्थेयी वाढ सर्वांगाने करून बालवाडीपासून उच्चमहाविद्यालयीन शिक्षणाच्या सोयी अनेक ठिकाणी निर्माण करून आपल्या संस्थेचे जाळे सर्वदूर पसरवले आहे. तरीदेखील या संस्थांना आपल्या सुविधा वाढविण्यासाठी निधीची गरज आहे.
या दोन्ही संस्थांसाठी स्थापनेपासूनचा इतिहास हा एक महत्वाचा ठेवा असतो. या संस्थांतून शिकून गेलेले व उद्योग, व्यवसायात यशस्वी झालेले माजी विद्यार्थी हे शिक्षणसंस्थेला पुन्हा तिच्या भावी कार्यासाठी भरीव अर्थसाहाय्य करू शकतात. असते. मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची व त्यांना संस्थेने घडविल्याची जाणीव करून देण्यासाठी संस्थेचा इतिहास, संस्थापकांचे योगदान, विद्येबरोबरच संस्कार दिलेल्या गुरुजनांची माहिती, संस्थेच्या प्रगतीतील विविध प्रसंग आणि यशस्वी माजी विद्यार्थ्यांची माहिती इंटरनेटवरून मिळावी यासाठी एक गौरवगाथा वा स्मरणिकारुपी वेबसाईट तयार केली तर ती संस्थेसाठी एक महत्वाचे साधन ठरेल
सध्या प्रत्येक संस्थेची वेबसाईट असतेच पण त्यात चालू शैक्षणिक कार्याची आणि सुविधांची माहिती द्यावी लागत असल्याने अशा ऐतिहासिक माहिती कोशासाठी जागा नसते शिवाय माजी विद्यार्थांशी संपर्क साधण्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही. यामुळे अशी वेगळी वेबसाईट माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून केल्यास प्रत्येक शिक्षणसंस्थेला नवसंजीवनी मिळेल.
वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली या संस्थेसाठी ज्ञानदीप फौंडेशनने वालचंद हेरिटेज या नावाचा प्रकल्प httP://walchandalumni.com या माजी विद्यार्थ्यांच्या वेबसाईटवर यशस्वीरीत्या सुरू केला. यासाठी माजी प्राध्यापक संस्था, माजी विद्यार्थी संस्था आणि कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी स्वयंस्फूर्त मदत केली.
वालचंद हेरिटेज प्रकल्पाद्वारे ज्ञानदीपने इतर सर्व शिक्षणसंस्थांना एक पथदर्शी प्रकल्प सादर केला आहे.
ज्ञानदीप इन्फोटेक या गेली वीस वर्षे वेबडिझाईन क्षेत्रात कार्य करीत असणा-या संस्थेने शिक्षणसंस्थेतील विद्यमान प्राध्यापकांच्या सहयोगातून असे हेरिटेज प्रकल्प करण्याचे ठरविले असून शिक्षणसंस्थांनी यात सहभागी व्हावे आणि आपली चिरंतन स्मृती नव्या सायबर विश्वात निर्माण करावी असे मला वाटते.
याबाबतीत This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. किंवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. येथे संपर्क साधावा
Hits: 147