१३. पुणे १९१३ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

 

प्रत्येक मराठी भाषेच्या अभिमानी माणसाने मराठी संभाषणात इंग्रजीवर पूर्ण बहिष्कार घालण्याचा निर्धार केला पाहिजे व तो अंमलात आणून गत अपराधाचे पूर्ण क्षालन केले पाहिजे. आज जर मराठी शुद्धीकरणाचा कायदा आस्तित्वात असता तर त्याने दर इंग्रजी शब्दामागे एक दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठेवली असती, तर आपणास असा निर्धार करण्याचे कारण पडले नसते. कायद्यापेक्षा अंत:स्फूर्तीनेच सुधारणा घडवून आणणे इष्ट असे प्रतिपादन करणार्‍यावर याबाबतीत अधिक जबाबदारी येते हे त्यांनी लक्षात ठेवावे. इंग्रजी शब्द जितक्या सौकर्याने मराठी संभाषणात शिरले तितकेच अवघड काम त्यातून त्यांना हुसकून लावणे होणार आहे. पण ते अवघड कामही एक आवश्यक कर्तव्य म्हणून आपण पार पाडले पाहिजे. निव्वळ मराठी शब्द सावकाश उच्चारित गेल्यास भाषाशुद्धीबरोबरच विचारांचा व्यवस्थितपणाही साधण्यासारखा आहे.

Hits: 1033
X

Right Click

No right click