काजू बिस्किटे

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
 
साहित्य :-
एक वाटी मैदा, एक वाटी दळलेली साखर, दूध, एक वाटी काजूची पूड, पाच चमचे तूप, एक चमचा बेकिंग पावडर, बदामाचा इसेन्स.

कृती :
काजूची पूड यंत्राने करून घ्यावी. मैदा, दळलेली साखर, तूप, बेकिंग पावडर व काजूची पूड एकत्र करून त्यात इसेन्स घालावा व चांगले एकत्र मिसळून घ्यावे. हे मिश्रण भज्याच्या पिठाइतपत घट्ट होईल इतके त्यात दूध घालावे व मिश्रण कालवून सारखे करावे. नंतर थाळीला तुपाचा हात लावून त्यावर त्या मिश्रणाची हाताने बत्तोशासारखी बिस्किटे घालून ओव्हनमध्ये ठेवून भाजून काढावीत.
Hits: 572
X

Right Click

No right click