मराठी विज्ञान परिषद, मुंबई

Parent Category: ROOT Category: संस्था परिचय Written by सौ. शुभांगी रानडे

२४ एप्रिल, १९६६ रोजी मराठी विज्ञान परिषदेची मुंबईत स्थापना झाली.

- मध्यवर्ती संस्था
संस्थेचे संकेतस्थळ -
http://www.mavipamumbai.org/
पत्ता-मराठी विज्ञान परिषद
विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग
शीव-चुनाभट्टी, मुंबई - ४०० ०२२
कार्यालय वेळ - मंगळवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस सोडून दररोज सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत.
दूरध्वनी क्र. 022-24054714 / 24057265 फॅक्स - 24057268
नोंदणीः
सोसायटी रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट: 1860 नुसार क्र.: BOM 81/66/GBBSD (दिनांक 12-8-1966)
बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट: 1950 नुसार क्र.: F-1429/BOM (दिनांक 6-9-1966)
(परिषदेला दिल्या जाणार्‍या देणग्या या कलम 80-जी नुसार आयकर सवलतीस पात्र आहेत.)

परिषदेची उद्दिष्टेः

विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.
विज्ञान मांडण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.
विज्ञानाचे जीवनातले महत्त्व वाढवणे.
लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी परिषद मध्यवर्तीद्वारे तसेच विविध विभागांद्वारे नानाविध उपक्रम करीत असते. शहरांमध्ये आणि खेडयांमध्ये, विद्यार्थ्यांत आणि नागरिकांमध्ये परिषद काम करते. परिषदेतर्फे अंध आणि मूकबधिरांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात.

समाजातील सर्व व्यक्तींमध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करणे, तसेच त्यांचा सहभाग कामामध्ये मिळवणे अशा रितीने परिषदेची कामे चालतात. परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेचे विविध वर्गाचे मिळून साडेतीन हजारांहून अधिक सभासद आहेत. परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून 66 ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, भोपाळ व बेळगाव या 4 ठिकाणी विभाग आहेत. या विभागांमार्फत मध्यवर्ती कडून निर्देशित केलेले तसेच अनेक स्वतंत्र कार्यक्रम वर्षभर घेतले जातात.

मराठी विज्ञान परिषदेला फाय फाऊंडेशन, इचलकरंजी आणि विज्ञान तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. डिसेंबर 1998 मध्ये मराठी विज्ञान परिषद पत्रिकेला महाराष्ट्र फाऊंडेशनचा वैचारिक मासिक म्हणून पुरस्कार मिळाला; महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार 2007 सालच्या पत्रिकेच्या दिवाळी अंकाला मिळाला; तसेच महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळाचा ‘दिवाळी अंक शताब्दी वर्ष 2008’ चा द्वितीय पुरस्कारही मिळाला आहे.

परिषदेचे विभाग
परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून 66 ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर 3 ठिकाणी विभाग आहेत. या विभागांची यादी भौगोलिक विभागणीनुसार पुढीलप्रमाणे आहे.


मुंबई व कोकणः
1) ईशान्य मुंबई, 2) ठाणे, 3) डोंबिवली, 4) अंबरनाथ, 5) चिंचणी-तारापूर, 6) बोर्डी, 7) रोहा, 8) रत्नागिरी, 9) नारिंग्रे


पश्चिम महाराष्ट्रः
10) लोणावळा, 11) तळेगाव, 12) पुणे, 13) बारामती, 14) अहमदनगर, 15) श्रीरामपूर, 16) संगमनेर, 17) कराड, 18) राजारामनगर, 19) सांगली, 20) कोल्हापूर, 21) गडहिंग्लज, 22) आजरा, 23) चंदगड, 24) बिद्री, 25) बार्शी, 26) सोलापूर


उत्तर महाराष्ट्रः
27) धुळे, 28) चाळिसगाव, 29) नंदुरबार, 30) खांडबारा, 31) साक्री, 32) नाशिक


मराठवाडाः
33) औरंगाबाद, 34) जालना, 35) उदगीर, 36) उमरगा, 37) नांदेड, 38) किनवट, 39) बीड, 40) हिंगोली, 41) उस्मानाबाद, 42) नळदुर्ग, 43) उमरी, 44) माजलगांव


विदर्भः
45) नागपूर, 46) वरोरा, 47) वणी, 48) अमरावती, 49) गडचिरोली, 50) अहेरी, 51) नवरगाव, 52) वाशिम, 53) अकोला, 54) मुर्तिजापूर, 55) बुलढाणा, 56) पारस, 57) पुसद, 58) उमरखेड, 59) भंडारा, 60) वडसा, 61) चंद्रपूर, 62) आर्वी, 63) आरमोरी, 64) मानोरा, 65) गोंदिया, 66) मालेगाव


महाराष्ट्राबाहेरः
67) वडोदरा, 68) गोवा, 69) बेळगाव

Hits: 343
X

Right Click

No right click