३५. १९५२ अंमळनेर - कृ. पां. कुलकर्णी

 

भाषा म्हणजे प्रेमाचा, जवळिकतेचा एक मोठा बंध आहे. भाषेमध्ये होणारा आविष्कार हा जर पहिला स्वभाव तर प्रज्ञा व प्रतिभा यामुळे होणारा आविष्कार हा मानवाचा दुसरा स्वभाव होय आणि तिसरा स्वभाव म्हणजे कलायुक्त आविष्कार होय. निसर्गमानव, स्वार्थीमानव, वेदान्तीमानव, समाजमानव, श्रेष्ठ समाजमानव, कनिष्ठ समाजमानव असे आविष्काराची निरनिराळे विषय आहेत. विशिष्ट आधिभौतिक शोधांमुळे समाजजीवनाचे सारखे रूपांतर होत आहे. ही एक सामाजिक क्रांतीच आहे. जुनी मूल्ये जाऊन नवी मूल्ये येत आहेत. ह्यामुळे समाजामधून जो एक भिन्न स्वभावाचा मानव उत्पन्न होत आहे तो यंत्रमानव - आर्थिकमानव. आणिहा ललित वाङ्मयाचा विषय होत आहे. यंत्रमानवाचे श्रेष्ठ रूप म्हणजे राजकारणी मानव व कनिष्ठ रूप म्हणजे श्रमिक मानव. दलित श्रमिक मानवाच्या गांजणुकीची भेसूरता दाखविली गेलीच पाहिजे. श्रमिक दलितांबद्दल अनुकंपा, कणव व सहानुभूती निर्माण झाली पाहिजे. श्रमाला, निढळ्या घामाला देव केला पाहिजे. तसे झाले म्हणजे यंत्रमानव हा दैत्य न होता यंत्रदेव होईल अशी ह्या प्रतिभावंतांनी काळजी घेतली पाहिजे.

Hits: 438
X

Right Click

No right click