३४. १९५१ कारवार - अ. का. प्रियोळकर
Category: संमेलने ३१-४०
देशाचे वाङ्मय हे राष्ट्रीय धन आहे. हस्तलिखित स्वरुपात असलेल्या या धनाचा एकदा नाश झाला म्हणजे ते पुन: मिळणे नाही. ज्या विविध व्यक्तींनी आणि संस्थांनी हस्तलिखिते परिश्रमपूर्वक गोळा केली, त्यांचे जतन केले पाहिजे. म्हणी, लोककथा, आणि निरनिराळ्या मराठी बोलीतील शब्द व वाक्प्रचार गोळा करणे ही एक कामगिरी होय. प्रत्येक बोलीतील ग्रांथिक मराठीहून भिन्न शब्द गोळा झाले पाहिजेत, त्यांचे व्याकरण लिहिले गेले पाहिजे. खालच्या वर्गातील बोलींकडे दुर्लक्ष होता कामा नये. मराठी भाषेचा शास्त्रीय व ऎतिहासिक दृष्टीने लिहिलेला कोश तयार होणे आवश्यक आहे.
Hits: 538