३१. १९४७ हैद्राबाद - न. र. फाटक
Category: संमेलने ३१-४०
साहित्य आणि संस्कृती, साहित्य आणि एकजिनसी राष्ट्रीयत्व, साहित्य आणि इतिहास यांचा परस्पर संबंध अतूट आहे. मराठीच्या अभिमानात अन्य भाषांना विरोध नाही. पण अल्पसंख्यांकांच्या भाषेच्या नशिबी वनवास येऊ नये. मानवदेहधारी देहाचे भाषा हे सर्वस्व असून त्याच्या स्वाभाविक व्यवहाराला प्रतिबंध करणे म्हणजे घोर कृत्य समजावे लागेल. देहापेक्षा जीवात्म्याला भाषेचा जास्त मोठा आधार व उपयोग असतो. तुरुंगात असताना टिळक लेखन, वाचन, चितन करून काळ घालवीत असले तरी त्यांना समाधान न वाटल्यामुळे कधीकधी ते स्वत:शीच मोठ्याने बोलत.
Hits: 591