आळवणी

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

आळवणी

संसाराच्या मोहातून सुटका व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी एक अत्यंत सोपा व प्रभावी उपाय म्हणजे देवाच्या चरणी लीन होणे. देवाची मनापासून केलेली विनवणी या कवितेत दिसते.

धाव घेई देवराया अंत नको पाहू
तूच माझा विठूराया काय तुला देऊ . . .

आकाशीच्या देवा तुला ठाऊके हे सारे
दु:ख कैसे सांगू तुला जाणुनी तू घेरे . . .

आकाशीच्या देवा किती करू आळवणी
आळवणी करता मी दाटे डोळा पाणी . . .

जगी काही नाही खरे आहे सारी माया
गुंते जीव त्यात जैसा भ्रमर सरोजी या . . .

नाम तुझे घेता परि विरे मोहमाया
सोडता हे गोड पाशा येती तुझ्या पाया . . .

Hits: 212
X

Right Click

No right click