नंदादीप

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

नंदादीप

भक्तिरूपी नंदादीप म्हणजे सतत तेवणारा दिवा. असा नंदादीप जर मनात लावला तर काहीही न मागता समाधान आपोआप चालत आपल्या दारात येते. समईचा प्रकाश शांत, मंद, शीतल असतो. त्या प्रकाशात दिसणारे देवघर, देवाची मूर्ती अधिक प्रसन्न वाटते. तसेच भक्तिरूपी नंदादीपाचे आहे.

आनंदाचा ठेवा, गवसला देवा
केशवा माधवा, आजन्म तुझी सेवा
आजन्म तुझी सेवा . . . १

आहे माझे मन, अति रे चपळ
दूर जाता मळ, जाहले निर्मळ
जाहले निर्मळ . . . २

हौस नाही उरली, पुरी असे भागली
मनभरी राहिली, देवा तुझी मुरली
देवा तुझी मुरली . . . ३

भक्तिनंदादीप, लाविता अनूप
दर्शनाचे सूख, येई आपोआप
येई आपोआप . . . ४

देवा तुझ्या दर्शने, धन्य मी जाहले
भरूनी पावले मन, हे निवाले
मन हे निवाले . . . ५

देवा तुझ्या दर्शनाचा, आनंद हा साचा
मूक होई वाचा, मार्ग हा मुक्तीचा
मार्ग हा मुक्तीचा . . . ६

Hits: 197
X

Right Click

No right click