जाणावेचि

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

जाणावेचि

येथे संतत्वाची व्याख्या केलेली आहे. देव हा प्रत्येक अणूरेणूत आहे. प्रत्येक माणसाच्या मनात आहे. फक्त प्रत्येक माणसाने ते स्वत: समजून घ्यावे लागते.

सुखाची प्रभात । दु:खाचा हो अंत ।
त्याचे नाव संत । जाणावेचि, जाणावेचि ।।

सीतेचा श्रीराम । मीरेचा घनश्याम ।
एकचि रामश्याम । जाणावेचि, जाणावेचि ।।

देव नाही दूरी । गिरी वा कंदरी ।
वसे चराचरी । जाणावेचि, जाणावेचि ।।

राही ना तो काशी । पुरी वा कैलासी ।
आपुल्या मानसी । जाणावेचि, जाणावेचि ।।

देव ना धनात । नसे काननात ।
असे तो मनात । जाणावेचि, जाणावेचि ।।

Hits: 214
X

Right Click

No right click