माझ्या मना

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

माझ्या मना

आई स्वत: कष्ट सोसून आपल्या बाळाला जन्म देते. लहानाचे मोठे करते. ह्या सुंदर जगाचे दर्शन घडवते. त्या देवतेसमान असणाऱ्या माऊलीचे सदैव स्मरण ठेवावे असा मनाला केलेला उपदेश प्रस्तुत कवितेत आहे.

माझ्या मना मी कथिते तुला
स्मर सदा तू त्या माऊलीला . . .

तुजसि जगी आणण्या देहा कष्टविले
स्वर्गीच्या अमृता तुजमुखी घातले
कष्ट सोसून किती तुजसि वाढविले
गणती कोणी न करू शकला
स्मर सदा तू त्या माऊलीला . . . १

काऊ-चिऊ दावुनी तुजसि भरवियले
गोष्टी सांगून किती तुजसि रिझवियले
तिजविना सुख ना कधी कुणा लाभले
मानी परमेशासम तू तिला
स्मर सदा तू त्या माऊलीला . . . २

देह आता तिचा जरि असे थकला
प्रेमाच्या शब्दासि जीव आसूसला
आशीषा तियेच्या राजाही भुकेला
ठेवी जपुनी या संदेशाला
स्मर सदा तू त्या माऊलीला . . .

Hits: 139
X

Right Click

No right click