चक्र

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

चक्र

दिवस-रात्र, उदय-अस्त, सुख-दु:ख असे हे चक्र पृथ्वीच्या पाठीवर सतत चालू असते. हे चक्र ज्या शक्तीच्या, नियतीच्या, निसर्गाच्या हातात आहे त्याच्या चरणावर घेतलेली शरणागती.

सुखापाठी ते दु:ख येतसे
दु:खापाठी सुख येई
कधी न हो अपवाद याजला
राजा वा तो रंक जगी . . . १

दिवसानंतर रात्र येई ती
रात्रीनंतर दिवस असे
सूर्यचंद्र अन् तारे यांचा
प्रकाश सकला एक असे . . . २

पूर्णचंद्र तो रोज न दिसतो
हळूहळू कमी होत असे
दिवस एकचि लुप्तचंद्र तरी
पुन्हा पुन्हा नव उगवतसे . . . ३

बीजामधुनी जन्मा येई
भलाथोरला वृक्ष जरी
अनंत बीजे जन्मा घालुनी
अखेर निद्रा भूमिवरी . . . ४

उदय-अस्त हा नियम असे ती
नियती आम्ही सदा स्मरू
जन्ममरण हे चक्र असे त्या
काळाला परि नमन करू .. . ५

Hits: 136
X

Right Click

No right click