सज्जनांचे अंगडे

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

सज्जनांचे अंगडे

वरवरच्या दिखाऊपणाला माणसाने भुलू नये. चमकते सारे सोने नसते.

रंग चांगा परि रस नोहे चांगा
काय भुललासी वरलिया रंगा . . . १

कडू कारल्याची सजावट भारी
कडू रसांतरी भरलेसे . . . २

दुर्जनाचे बोली असे जरी गोडी
अंतरी लबाडी भरलीसे . . . ३

सज्जनांचे अंगी साधेचि अंगडे
मनी क्षमाशांती भरलीसे . . . ४

Hits: 142
X

Right Click

No right click