कुणा वाटे
कुणा वाटे आनंद निसर्गात
कुणा येई मजा भोजनात
कुणी घेती रस राजकारणात
सुखही वाटे ते दुजा शिकवण्यात . . .१
गर्क होती ते कुणी सिनेमात
गुंग होती कुणी तसे नाटकात
कुणी होई ते धुंद गायनात
जाई रंगूनी तो कुणी कुंचल्यात ... २
बुडूनी जाती ते कुणी वाचनात
हौस वाटे ती कुणा खेळण्यात
छंद लागे तो कुणा काव्यलेखनात
दंग होती ते कुणी चिंतनात .. . ३
कुणा दिसते सुख कलाकुशलतेत
धन्य म्हणती कुणी धनधान्यसंचयात
सौख्य वाटे परि कुणा चाकरीत
सुखी राही कुणी गोरगरीबीत .. . ४
सुखही वाटे ते कुणा निंदण्यात
नसे मजला परि रागही मनात
सत्यवाणी ज्या वसे ती मुखात
जगी दुर्मिळ नर असा पाहण्यात ... ५
Hits: 93