विनती
इतिहासाच्या पानोपानी
रक्त रंजित पडती सडे
युध्दाच्या त्या खाईमध्ये
देश अडकती बडे बडे ... १
दो हत्तींच्या लढतीमध्ये
चिरडूनी जाती सान किडे
तैसे जाई प्रजाजनांचे
मोडूनी मग ते कंबरडे ... २
जगात सगळे जुलूस काढती
युध्द नको मज शांती हवी
परि आर्त स्वरांनी पुकारलेली
कानी हाक त्या कशी जावी ... ३
पैशाच्या त्या जोरावरती
शिकवू नये कुणी कुणा धडे
परस्परातील वैरापायी
सदैव जगती युध्द घडे ... ४
सुखी रहा तू तुझ्या घरी
अन् मीही राहतो सुखी इकडे
सुमती ऐसी जरी ठेवता
नांदे शांती चोहीकडे ... ५
हुसेन आणखी बुश दोघांना
सौजन्यचि ते दे थोडे
विनती माझी एकचि इवली
अल्ला आणि येशुकडे ... ६
Hits: 97