देहाची नाव

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक परिचय Written by सौ. शुभांगी रानडे

पुराणी नाव पुराणी नाव
देवा हिला तिराला लाव --- ध्रु.

अवेळी तिजला बुडवू नको रे
कार्य संपता उचल मुरारे

मम हाकेला धाव
देवा हिला तिराला लावा --- १

सुत स्नुषा हे संपत्तीचे
तनु थकल्यावर कुणी न कुणाचे
प्रेमाचा अभाव
देवा हिला तिराला लावा --- २

बुद्धिहीन मी असे बापुडी
तब नामाची कळली गोडी
चरणाशी दे ठाव
देवा हिला तिराला लाव --- ३

ध्यान तुझे मम हृदयी राहो
नाम मुखाने अखंड येवो
अमर करी तू नाव
अपुले अमर करी तू नाव
देवा हिला तिराला लाव --- ४

- यशोदाबाई शिंत्रे
सौ. शुभांगी रानडे यांच्या मातोश्री

Hits: 144
X

Right Click

No right click