विनर्स टेक ऑल - लेखक - टोनी सेबा
विनर्स टेक ऑल - लेखक - टोनी सेबा
यशस्वी आधुनिक व्यवस्थापनाचे नवे नियम
स्टॅन्फोर्ड विद्यापिठातील प्राध्यापक व कॅलिफोर्नियातील मोठ्या कंपन्याचे सल्लागार टोनी सेबा यांनी हे पुस्तक लिहिले आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रविज्ञानाच्या व तीव्र स्पर्धेच्या युगात यशस्वी झालेल्या गुगल, क्रेगलिस्ट,सिमॅंटेक, नेटफ़िक्स या उद्योगांनी कोणत्या व्यवस्थापनपद्धती वापरल्या याचा अभ्यास करून आधुनिक व्यवस्थापनाचे खालील नऊ नियम सुचविले आहेत.
१. अपेक्षित ग्राहकवर्गाला सध्या येणार्या अडचणींचा शोध घॆऊन त्यावर प्रभावी उपाय ठरणार्या वस्तू वा सुविधेचे संकल्पन व उत्पादन करा.
२. त्या वस्तू वा सुविधेवर लक्ष केंद्रित करून ग्राहकांना आकर्षित करा, उत्पादन संख्या वाढवून त्यात गुणवत्तावाढ व बचत करा.
३. वस्तूच्या बाह्यांगात सुधारणा करण्यापेक्षा वस्तूच्या उपयुक्ततेत भर घाला.
४. सुविधेबाबत कथानक तयार करा व त्याचा प्रसार करा.
५. या धकाधकीच्या जीवनातील भीती घालवून ग्राहकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करा.
६. तडजोडीपेक्षा सन्मानपूर्ण व्यवहार करा.
७. योग्य सहकारी निवडा त्यांच्याशी स्पष्ट संबंध ठेवा.
८. वापरण्यास सुलभ अशा वस्तू वा सुविधांचे उत्पादन करा.
९. तुमचा व्यवसाय उत्तम चालला आहे. अभिनंदन. पण आता त्यात नवीन बदल करा अन्यथा नुकसानीस सामोरे जाल.
वरील नियम वापरल्यास सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात उद्योग आपली प्रगती वेगाने करू शकतील व यशस्वी होतील असे लेखकाचे मत आहे.