अनुक्रमणिका - मराठे व इंग्रज पूर्वार्ध इतिहास

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर Written by सौ. शुभांगी रानडे


मराठे व इंग्रज
पूर्वार्ध इतिहास

प्रकरण पहिले:--
इंग्रजांपूर्वीचे महाराष्ट्र--( १-८ )
मराठे व इंग्रज यांची पहिली भेट झाल्या वेळीं त्यांची परस्परांविषय़ीची वृत्ति-इंग्रज व हिंदुस्थान यांचा संबंध आला हे आश्चर्यातले आश्चर्य -सतराव्या शतकाच्या प्रारंभी उदयोन्मुख झालेल्या दोन सत्ता--तत्कालीन हिंदुस्थानची स्थिति- दिग्विजयानें अंतर्व्यवस्थेत जेत्याचा हात शिरत नसे-मुसलमानी विजयाचे सामान्य स्वरूप-त्याने हिंदु अधिकार भ्रष्ट झाले नाहींत-उत्तर व दक्षिण हिंदुस्थानांतील मुसलमानी सत्तेतील भेद - दक्षिणेंतील मुसलमानी अम्मल मराठ्यांना जाचक न वाटण्याची कारणें (५)-मुसलमानांनीं मराठ्यांना पूर्णपणें कधींच जिंकले नव्हते ( ६ )- महाराष्ट्राची भू-रचना स्वातंत्र्यबुद्धीस अनुकूल ( ७ ) इंग्रजांना मराठी सत्तेशी लढावे लागलें; मुसलमानांशी नव्हे ( ८ )--मोंगलांच्या दक्षिणेतील स्वाऱ्यांमुळे मराठे स्वातंत्र्याची इच्छा करू लागले .

प्रकरण दुसरे --
इंग्रज हिंदुस्थानांत कां व कसे आले? (८-१७)
हिंदुस्थान व यूरोप यांमधील प्राचीन काळचा व्यापारी संवंध (९ )- या व्यापारी दळणवळणाचे मार्ग ( १० )- हिंदुस्थानांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार ( १० )-हिंदुस्थानांतील पोतुंगीज रियासत ( ११ )-डच रियासत ( १२ )-१६०२ पूर्वी हिंदुस्थानांत आलेले इंग्रज ( १३ )-एलिझाबेदचे अकबरास पत्र ( १४ )-हॉकिन्स हिपोन कौलिंग डाउंटन रो कीलिंग व केरीज यांनी केलेल्या उलाढाली ( १५ )-हिंदुस्थानाशी चालणाऱ्या व्यापारापासून युरोपियन व्यापाऱ्यांना मिळणारा जबर फायदा ( १९ )-रोचा रिपोर्ट ( १७ )

प्रकरण तिसरेः-
मराठे व इंग्रज-पूर्वरंग ( १८-८० )
मराठे मोगल व इंग्रज यांचे संबंध ( १८ )-शिवचरित्राचे आलोचन ( १९ )-शिवाजी व इंग्रज यांचा राजापूर, सुरत, कारवार व हुबळी येथे आलेला संबंध (२०-२२ )-१६७४ चा तह ( २३ )-शिवाजी, इंग्रज व सिद्दी यांचे संबंध ( २४ )-शिवाजी व इंग्रज यांच्या संबंधाविषयी व मराठी रियासती मधील उतारे( २५-२९ )-खांदेरीउंदेरी प्रकरण ( २९-३० )-संभाजी व इंग्रज (३१) सावंतवाडीकर, देसाई व इंग्रज ( ३२२ )-आंग्रे व इंग्रज ( ३३ )-पहिला बाजीराव, हबशी व इंग्रज ( ३३ )-आंग्रे, नानासाहेब व इंग्रज ( ३४ )-पोर्तुगीज, मराठे व इंग्रज ( ३४ )- पिंटोचें मुंबईच्या गव्हर्नरास पत्र ( ३५ )-मराठ्यांनीं वसई घेतल्यामुळे पोर्तुंगीज व इंग्रज यांवर झालेला परिणाम ( ३६ )-शाहूच्या दरबारांत पेशव्यांचे शत्रू कोण याची टेहळणी करण्यासाठी इंग्रज वकील पाठवितात ( ३७ ) गॉर्डन शाहूची भेट घेतो ( ३७ )-१७३९ मध्ये मराठ्यांविषयी इंग्रजांचे अभिप्राय (३८-३९) -चिमाजीकडे इंचवर्डची वकिली ( ३९ ) इंग्रज व पेशवे मिळून आंग्र्याचा पराभव करतात ( ४१ )-मराठे व इंग्रज यांचा तह ( ४१ )-नानासाहेब व मुंबईकर यांमधील पत्रव्यवहार व स्पेन्सरचा रिपोर्ट ( ४२ ) -वुइल्यम प्राइझ यांस १७५९ सालीं मुंबई कौन्सिलने दिलेली समजूत ( ४३ )-प्राइझ व नानासाहेब यांची भेट ( ४४ )-मॉस्टिन
यास माधवरावाकडे पाठविल्या वेळीं दिलेली समजूत ( ४५ )--मॉस्टिन माधवरावास भेटतो ( ४९ )-मॉस्टिनचे मुंबईस पत्र ( ४७ ) मॉस्टिन नाना फडणविसाची गांठ घेतो (४७ )-मॉस्टिन व ओम यांचें माधवराव ब राघोबा यांशी बोलणें ( ४८-४९ )-माधवराव व मॉस्टिन यांच्या दरम्यान ठरलेली कलमे ( ५० )- इंग्रजांचा वकील पुण्यास राहूं दिल्यामुळे झालेले परिणाम (५१ )--दादासाहेब पेशव्यांच्या शत्रूंकडे मदत मागतात ( ५२ )-इंग्रज साष्टी घेतात (५३ )-इंग्रज राघोबाशी तह करतात ( ५४ )--मुंबईकर व कलकत्तेकर इंग्रज यांमधाले मतभेद ( ५४ )-मुंबईकरांचा खलिता ( ५५ ) राघोबाचा पक्ष उचलल्यापासून इंग्रजांचा हाणारा फायदा ( ५६ )-राघोबाच्या नादानीची मीमांसा
( ५७ )-राघोबाची महत्त्वाकांक्षा ( ५७ )--माधवराव व राघोबा (५८ )-राघोबा व नारायणराव ( ५९ )--राघोबा व बारभाई ( ६० )-राघोंबा व महादजी ( ६० )--राघोबाचा पळ ( ६१ )--इंग्रजांशीं तह करतो (६२)-कलकत्तेकर व मुंबईकर इंग्रज यांमधील मतभेद ( ६३ )-राघोबाची बिकट स्थिति ( ६४ )-इंग्रज राघोबाचा पक्ष सोडतात ( ६५ )- इंग्रजी मुलुखातून निघून जाण्याबद्दल राघोबास तगादा ( ६६ )-पुरंदरचा तह. ( ६७ )-राघोबाचे इंग्लंडच्या राजास पत्र ( ६७ )-मराठे व फ्रेंच यांच्यामध्ये तह झाल्याच्या अफवा (६८ )- पुण्याच्या कारभाऱ्यांत दुही माजलेली पाहून इंग्रज पुनः राघोबाचा पक्ष उचलतात ( ६९)-कर्नल एगटर्नची मुंबईहून ससैन्य रवानगी ( ७० )-एगर्टनच्या हालचाली व इंग्रजांचा पराभव ( ७१ )-वडगांवचा तह (७२)-राघोबा शिंद्याच्या स्वाधीन होऊन त्यांची झांशीकडे रवानगी करण्यांत येते ( ७३ )-सयाई माधवरावाचे विलायतच्या बादशहास पत्र ( ७४-८० ).

प्रकरण चवथे:--मराठे च इंग्रज-उत्तररंग-( ८१-११८) गाडर्ड पुण्यावर चालून येतो ब पराभूत होतो (८ १)-राघोबा शिंद्याच्या कैदेतून निसटतो ( ८२ )-हैदरअलीने उचल खाल्यामुळें इंग्रज मराठ्यांशी सालबाईचा तह करतात ( ८३ ) राघोबा कारभाऱ्यांच्या स्वाधीन होतो ( ८४ )-इंग्रजांचा वकील मॅलेट पुण्यास येतो ( ८५ )-मराठ्यांची टिपूवरील मोहीम ( ८५ )---टिपूवरील दुसरी स्वारी ( ८६ )-टिपृवरील तिसरी स्वारी (८७)-महादजींच्या मागे नानाची स्थिती ( ८८ )-नाना बाजीरावास गादीवर येऊं न देण्याची खटपट करतो; पण मग आपणच त्या गोष्टीस कबूल होतो ( ८९ )-चिमाजी आप्पाचे दत्तविधान ( ९० )-शिंद्याच्या गोटांत नानास कैद ( ९१ )-नाना शिंदे बाजीराव व इंग्रज यांचीं कारस्थाने ( ९२ ) नानाचा मृत्यु ( ९२ )---शिंदे ब बाजीराव यामध्ये युद्ध ( ९३२ ) इंग्रजी सैन्य ठेवून घेण्यास बाजीराव फर्मान देतो ( ९४ )-कर्नल क्लोजची मध्यस्थी ( ९४ )-वसईंचा तह ( ९५)-बाजीरावाची पुण्यास स्थापना ( ९६ )-आसई व लासवारी (९६ )-१८०३मधील व्हाइसरायानें केलेलें पेशवाईचे परीक्षण ( ९७ )-शिंदेशाहीचें परीक्षण ( ९८ )-इंग्रजांचे होळकरांशी युद्ध व तह (९९ )- बेकार शिपायांची स्थिती व पेंढाऱ्यांची वाढ ( १०० )--बाजीरावाचा मूर्खपणाचा कारभार (१०१ )--
त्र्यंबकजी डेंगळ्याचा स्वभाव ( १०३ ) गंगाधरशास्त्र्याचा खून ( १०४ )-या खुनाच्या प्रकारणाची दुसरी बाजू ( १०७५ )-बापू मैराळाने लिहिलेली खुनाची हकीकत ( १०९६ ) त्र्यंबकजी इंग्रजांच्या कैदेत पडतो व तेथून निसटतो ( १०७ )--पेशव्याकडे अल्यिष्टनाचा त्र्यंबकजीस धरण्याबद्दल तगादा ( ५०७ )-बाजीराव व इंग्रज यांमध्ये नवा तह (१०८)-बाजीराव छत्रपति व सरदार यांना संमतीत घेण्याची खटपट करतो ( १०९ )-इंग्रजांच्या सैन्यांत फितुर करण्याचा प्रयत्न ( ११० ) बाजीराव व अल्पिष्टन यांत बिघाड होऊन खडकीची लढाई होते ( १११ )-स्मिथ पुण्यास येतो व पुण्यास इंग्रजी निशाण फडकू लागतें (११२)-बाजीरावाच्या मार्ग पुण्याची स्थिति (११३)-स्मिथ बाजीरावाचा पाठलाग करतो ( ५१६५ )- अष्टीची लढाई (११६ )--बाजीराव माल्कमच्या स्वाधीन होतो. ( ११७ ) बाजीरावाचा ब्रह्मवतीतील आयुष्यक्रम ( ११८ ).

Hits: 163
X

Right Click

No right click