उपोद्धात - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर Written by सौ. शुभांगी रानडे

महाराष्ट्राचा नुसता इतिहास समजावून देणाराी पुस्तके बऱ्याच लोकांनी लिहिली आहेत; परंलु त्याहूनही अधिक महत्त्वाचं काम सदर विषयावर सविस्तर स्वतंत्र टीकाप्रबंध निर्माण करणें हे होय. असलें बिकट काम रा. रा. नरसोपंततात्या केळकर या अधिकारी ग्रहस्थांनी हाती घेऊन पार पाडिले यावद्दल वाचकवर्ग त्यांचा ऋणी आहे. असल्या ग्रंथांतून स्थल काल व व्यक्ति यांसंबंधाचे निर्देश कचित्‌ बिनचुक नसले तरी ती गोष्ट मुद्द्याची नसल्यामुळें त्या त्या ठिकाणच्या ऊहापोहाला वैगुण्य येत नाही. प्रत्येक स्थळी साधकबाधक प्रमाणे दाखवून प्रंथकार आपले म्हणणे कितपत सिद्ध करितो एवढेंच मुख्यत्वे पहावयाचे असतें. आणि तशा दृष्टीनें पाहणाऱ्याला रा. रा. नरसोपंत केळकर यांनी प्रकरणशः केलेली चर्चा मुद्देतूद व समर्पक आहे हेच मान्य करावें लागेल. ग्रंथकाराच्या या चर्चेपासून निष्पन्न होणारा तात्पर्यार्थ, मराठ्यांचे राज्य इंग्रजांनाी कां व कसे घेतलें, हाच होय. आताच्या काळांत या विषयाचें महत्त्व निव्वळ ऐतिहासिक आहे हें उघडच आहे. तरी याच्या चिंतनापासून ' पुढच्यास ठेंच मागचा शाहाणा ' या न्यायाने आजमितीससुद्धा फारच बोध घेतां येण्याजोगा आहे. या विषयावर मी चार शब्द लिहावे अशी ग्रंथकारांची इच्छा दिसल्यानुळें या उपोद्धाताच्या रूपानें तसें करीत आहे.

हे पुस्तक पाहिल्याबरोबर पहिली गोष्ट मनांत येते ती हीच की, हे शतसांवत्सरिक वाडूमयश्राद्ध म्हणून जें केलें आहे ते अंतरिम श्राद्ध होय ! याची खरी तिथी
म्हणजे तारीख - ३१ डिसेंबर सन १९०२ ही होय. कारण, मराठी साम्राज्याच्या स्वातंत्र्याचा लोप होऊन त्या तारखेस बरोबर शंभर वर्षे झाली! सन १८०२ सालच्या शेवटच्या दिवसाने स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा शेवट पाहिला. सर्व स्वतंत्र मराठी राज्यास पूर्वीपासून ' शिवशाद्दी ' हे नांव चालत आलें आहे. या शिवशाहीला हुकमतींत वागवून तिचें स्वस्तिक्षेम सांभाळण्याचा ज्याचा परंपरागत अधिकार, त्या बाजीराव पेशव्यानें सन १८०९ च्या डिसेंबर महिन्याच्या ३१ व्या तारखेस इंग्रजांशी वसईचा तह करून त्यांचा आश्रय व ताबेदारी संपादन केली. शिवशाहीच्या स्वातंत्र्यसौभाग्याचा कुंकुमतिलक तिच्याच त्या नादान पोरानें त्या तहाच्या चिटोर्‍्यानें पुसून टाकला.

सन १८१८ साली मराठी राज्य नष्ट झालें हे म्हणणें खरे नाही. कारण, अजून सुद्धा दोनअडीच कोटी रुपये उत्पन्नाचे मराठी राज्य आहेच. परंतु त्या राज्याला आतां कोणी शिवशाहीचा भाग म्हणत नसून तो ब्रिटिश साम्राज्याचा एक घटकावयव आहे असेंच मानण्यांत येते. पेशवाई बुडाल्यासुळें पुष्कळ श्रीमंत घराणी धुळीस मिळाली, हजारो लोकांचें अन्न गेले, हो गोष्ट वाईट झाली हे खरे; परंतु नागपूरचे राज्य खालसा झालें त्यापेक्षां पेशवाई नष्ट झाली या गोष्टीला अधिक किंमत देतां येत नाही. बाजीराव जर इंग्रजांशी सरळपणानें वागता तर दुसर्‍या कित्येक मराठी संस्थानांप्रमाणे त्याचेंही संस्थान कदाचित्‌ अद्यापिसुद्धां जिवंत राहिले असतें, परंतु शिवशाहीच्य़ा दृष्टी त्याची किंमत केव्हांहि शुन्यच ठरली असती.

शिवशाहीचें स्मरण १९०२ मध्यें होवो अगर १९१८ मध्ये होवो, ते शतसांवत्सरिक असो, प्रतिवार्षिक असो अगर प्रत्यही होणारे असो; जेव्हां जेव्हा ते स्मरण महाराष्ट्रांत जन्म पावलेल्या कोणाही मनुष्यास होते, तेव्हां तेव्हां तो आपल्या मनास खेदानें व आश्वर्याने असा प्रश्न करितो की, हे गतकालीन राज्यवैभव इतक्या अल्पावकाशांत कसे नष्ट झालें? मोठे मोठे विशाल बुद्धीचे मुत्सदी व महापराक्रमी सरदार शिवशाहीत हयात होते ते सर्वच अदूरदृष्टि होते की काय? इंप्रजी हल्ल्यापासून स्वराज्याचा बचाव करण्याचा उपाय कोणीच कसा आगाऊ योजून ठेविला नाही?

परद्वीपाहून आलेल्या मूठभर इंम्रजांनीं शिवशाही पादाकांत केली हें घडले तरी कसे? या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत अनेकांनी अनेक दिली आहेत ती. सर्वच खरी आहेत असें नाही. कांही तर अगदीच अप्रयोजक आहेत; पण अशाच उत्तरांत सत्याचा थोडाबहुत अंश निर्विवाद आहे. असल्या त्या सर्व उत्तरांवर सविस्तर टीका या ग्रंथांत आलीच आहे. तरी विषयाचं स्वरूप वाचकांच्या लक्ष्यांत अधिक स्पष्टपणें यावे म्हणून त्याची निराळ्या तऱ्हेने मांडणी केल्यास ती रा. केळकर यांच्या टीकेस अधिक पोषकच होईल.

Hits: 110
X

Right Click

No right click