२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

सक्तमजुरीत मस्त

देशातील वातावरण तापत होते. चळवळीला अनुकूल होत होते. त्या वेळी एस्‌. एम्‌. गोरे आणि खाडिलकर या यूथ लीगच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये युवक परिषद घेण्याचा निर्णय घेतला आणि तरुणांचे आवडते नेते बाबू सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष म्हणून बोलाविले. १९२१च्या डिसेंबर मधील पुण्यातील ही युवक परिषद देशभर गाजली. त्यानंतर काही दिवसांनीच पं.जवाहरलाल नेहरूंना अटक झाली. त्यांच्यानंतर सुभाषबाबूंना ५ जानेवारीस पकडण्यात आले. व्हाइसरॉय लॉर्ड विलिग्डंन याने स्वातंत्रय चळवळ चिरडून काढण्याचा निर्णय घेतला आणि अनेक जुलमी वटहुकूम लागू केले. एस. एम्‌., गोरे आणि खाडिलकर यांना प्रथम दोन महिने स्थानबद्ध केले. या तिघांनीही स्थाननबध्दतेचे निर्बंध मोडून अटक करून घेण्याच्या निर्णय घेतला.

२३ मार्चला भगतसिंगांची पहिली पुण्यतिथी होती. त्या दिवशी एस्‌. एम्‌.,गोरे यांनी स्थानबद्धतेचा भंग करून ते कॅन्टोन्मेंट हद्दीतून बाहेर आले. या वेळी त्यांना पकडण्यात आले. दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेटपुढे त्यांना उभे करण्यात आले. एस्‌. एम्‌. यांनी आपले प्रखर विचार मांडणारे निवेदन वाचले. मॅजिस्ट्रेटने त्यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली. तेव्हा एस्‌. एम्‌. यांनी तुरुंगात 'क' वर्ग ('सी' क्लास) मिळावा, अशी विनंती केली. सर्व सामान्य सत्याग्रहींबरोबर राहता यावे म्हणून त्यांनी निकृष्ट दर्जाच्या 'क' वर्गीय शिक्षेची मागणी केली. पोलिस प्रॉसिक्युटर त्यांना म्हणाला, “तरुण माणसा, तू सहदय आहेस. पण तुला डोके नाही." एस्‌. एम्‌.ना येरवडा तुरुंगात नेण्यात आले. आत्मकथेत या कारावासाचे वर्णन करणाऱ्या प्रकरणाला एस्‌. एम्‌. यांनी शीर्षक दिले ते आहे, “सक्त मजुरीत मस्त.” जेलमधील अन्न निकृष्ट होते. सर्व तऱ्हेचे हाल होते. पण एस्‌. एम्‌. मस्तीत होते. रात्री बराक बंद झाल्यावर समाजवादावरील मार्क्सचे विचार वाचीत होते. तीस सालातील पहिल्या तुरूंगवासाप्रमाणेच इतर राजबंद्यांचे केस कापत होते. ध्येयधुंद अवस्थेत हालअपेष्टांचे काहीच वाटत नव्हते. पुढे सुटल्यावर एस्‌. एम्‌. यांनी 'किर्लोस्कर' मासिकात 'तुरूंगातील दिवाळी' म्हणून एक सुंदर लेख लिहिला होता.

त्या वेळी म. गांधीही येरवडा तुरूंगात होते. मात्र ते दुसऱ्या वॉर्डमध्ये होते. एस्‌. एम्‌.ना आचार्य भागवतांबरोबर गांधीजींना भेटण्याची एकदा संधी मिळाली. त्या वेळी त्यांनी गांधीजींना हिंसा-अहिंसेबद्दल काही प्रश्‍न विचारले.पुढे गांधीजींनी दलितांना विभक्त मतदार संध देण्याच्या विरोधात प्राणांतिक उपोषण सुरू केले. या उपोषणानंतर 'गांधी-आंबेडकर' करार होऊन विभक्त मतदार संघ रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

गांधीजींचे उपोषण चालू असताना, त्या उपोषणमागच्या भूमिकेस पाठिंबा म्हणून आचार्य भागवत, एस्‌. एम्‌. आदी राजबंद्यांनी तुरुंगात भंगीकाम मागून घेतले. या एकूण अनुभवाबद्दल एस्‌. एम्‌. यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिले आहे

“अशा प्रकारे तुरुंगवासात मी न्हावी झालो, भंगीही झालो. म्हणूनच मी नेहमी म्हणतो कौ तुरुंगात गेल्यावर मी पूर्ण नागरिक झालो. पूर्ण या अर्थाने की देशातील वात काही माणसांना त्यांच्या कामावरून लेखण्यात येते ते बरोबर नाही, हे तुरुंगवासाने माझ्या मनावर बिंबवले. मुसलमानांसंबंधीदेखील आपला दृष्टिकोन बरोबर नाही. तुरुंगात र्दू शिकल्याकारणाने मुसलमान माझ्याकडे शंभरदा येत. म्हणूनच मी म्हणती को तुरुंग हे असे विद्यापीठ आहे, की ज्याच्यामुळे मी भारताचा 'पूर्ण' नागरिक झालो. “

Hits: 109
X

Right Click

No right click