११. रयत शिक्षण संस्थेची अर्थव्यवस्था - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

११. रयत शिक्षण संस्थेची अर्थव्यवस्था - २

४) यापूर्वी सांगितल्याप्रमाणे शिक्षणातून ग्रामीण नेतृत्व तयार करण्यासाठी भाऊराव स्वत:चा व जनतेचा पैसा वसतिगृहातील मुलांवर खर्च करीत. सन १९३७ साली रयत शिक्षण संस्था चालविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांतून काही आजीव सेवक तयार केले. म्हणजे मानवी साधनसंपत्ती निर्मिण्यात पैसे गुंतविण्याची कल्पना शास्त्रीय किंवा आर्थिक परिभाषेत त्यांनी अक्षरबद्ध केली नव्हती तरी कृतीतून प्रकट झालेली दिसते. त्यांचे विचार अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञासमान आहेत. शिक्षणावरचा खर्च म्हणजे संधीची किंमत होय (opportunity cost), असे ते मानत.

५) मानवी साधनसंपत्तीच्या निर्मितीसाठी गुंतवणूक ही कल्पना अगदी अलीकडे (१९६०) शिक्षणाचे अर्थशास्त्र या नवीन अर्थशास्त्राच्या शाखेत प्राध्यापक द्वय टी. डब्ल्यू शुल्झ व जे. के. गालब्रेथ यांनी विकसित करून शब्दबद्ध केली. परंतु ती २०० वर्षांपूर्वीच प्रा. अँडॅम स्मिथने सांगून
ठेवलेली होती. भाऊराव अर्थशास्त्रज्ञ नव्हते, त्यांनी अंमलात आणलेला व्यवहार अर्थशास्त्रीय भाषेत त्यांनी मांडलेला नाही एवढेच. भारताच्या
मध्यवर्ती शासनाने सुद्धा गेल्या काही वर्षांपासूनच 'ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मंत्रालय" सुरू केलेले आहे. म्हणजे जुन्या व्यवहारास हे नवीन
नाव देण्यात आलेले आहे.

६) सन १९११ ते १९३५ या कालावधीनंतर मानवी साधनसंपत्तीत गुंतवणूक हा विचार संस्थेच्या ध्येयधोरणाच्या स्वरूपात पक्का झाला. शिक्षण हेच एक असे क्षेत्र होते की यातून निर्माण झालेली मानवी साधनसंपत्तीची पुनर्गुतवणूक याच क्षेत्रात संस्थेने मोठ्या प्रमाणात केली. संस्थेच्या पहिल्या घटनेत ध्येयामध्ये तरुण पिढीस शिक्षण देण्यासाठी शिक्षक तयार करणे व ग्रामोद्वारासाठी, उद्योगधंद्यासाठी ग्रामसेवक तयार करणे हे दुसर्‍या व तिसऱ्या कलमात आहे. आपणांस असे दिसून येते, की सातारच्या ट्रेनिंग कॉलेजमधून तयार झालेले प्राथमिक शिक्षक संस्थेच्या स्वयंसेवी शाळात मुरले, ते आणि संस्थेच्या माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयातील मुले शिक्षकी पेशाची टी. डी. किंवा बी. एड. पदवी घेऊन तयार झालेले शिक्षक म्हणजे हे मानवी भांडवल पुन्हा शिक्षणक्षेत्रात, संस्थेच्या शाळांत पुनर्गुतवणूक म्हणून सामील झाले आणि भाऊरावांचा रयत शिक्षण संस्थारूपी सेवाभावी शैक्षणिक 'उद्योग समूह' उभा राहत गेला.

७) सुरुवातीच्या काळात, आपल्या मुलांच्या शिक्षणावर भांडवल म्हणून पैसा खर्च करणे, सामान्य अडाणी निरक्षर जनतेस पटविणे भाऊरावांना फारच अवघड जात असे. त्यासाठी औद्योगिक माध्यमांचा किर्लोस्करवाडी व सातार Hits: 112

X

Right Click

No right click