९. शिक्षणातील प्रयोग - ४
९. शिक्षणातील प्रयोग - ४
१०) इंग्रजी स्पेशल क्लास व इयत्ता चौथी या वर्गात सुमारे ६० विद्यार्थी पहिल्या वर्षी दाखळ झाले. पैकी पाच विद्यार्थी स्कॉलरशिप मिळाल्याने शासकीय माध्यमिक शाळेत दाखल झाले. या शाळेचे ध्येय स्वावलंबन व अममाहात्म्य असल्याने ता. १८ जून १९४० रोजी धनिनीच्या बागेतील वसतिगृहात व सोमवार पेठेतील वसतिगृहात राहिलेले सर्व विद्यार्थी फलटण लॉजवर आपल्या वळकट्या व ट्रंका घेऊन हजर झाले. श्री. शांताराम भाऊराव काकडे ऊर्फ होळकर हे बी. ए. झालेले संस्थेचे माजी विद्यार्थी या मुलांसमवेत मुख्याध्यापक म्हणून या इमारतीत दाखल झाले. पहिले श्रमदानाचे काम म्हणजे ही फलटण लॉंजची जुनी इमारत स्वच्छ करणे. इमारत बरेच दिवस रिकामी असल्याने ती आतून बाहेरून जळमटे व केरकचरा काढून स्वच्छ करण्यात आली. या इमारतीच्या दर्शनी भागी असलेल्या दोन मोठ्या हॉलमध्ये वर्गांची व पिछाडीच्या एका खोलीत शाळेचे कार्यालय व व्हरांड्यात शाळेचे पुस्तकालय मांडण्यात आले.
११) मागील भागातील पाचसहा खोल्यांतून मुलांची निवासाची सोय करण्यात आली. या शाळेस जोडून असलेल्या या वसतिगृहास छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस शाखा नं. २ म्हणण्यात येत असे. येथील जेवणाची, स्वर्यंपाकाची सारी व्यवस्था धनिनीच्या बागेतील वसतिगृहाप्रमाणेच होती. धनिनीच्या बागेतील कै. रा. ब. काळे प्राथमिक शाळेतील सातवी पास झालेल्या व इंग्रजी चोथी नापास झालेल्या काही मुलांनाच सुरुवातीस स्वयंपाक गटाचे प्रमुख करण्यात आले व नवीन मुले त्यांच्या मदतीस देण्यात आली.
१२) या वसतिगृहात अधिक गुणवत्ता असलेल्या मुलांना जेवणाच्या बिलाच्या मोबदल्यात जमाखर्च लिहिण्याचे, भोजन सेक्रेटरीची
अन्न सेक्रेटरीची व भांडारपालांची कामे दिठेली असत. दररोज सकाळी ८ ते १० पर्यंत सर्व मुलांना 'चार भिंती' येथे दोन तास खडी फोडण्याचे,
वडारांनी खोदलेली माती पसरून जमीन सपाट करण्याचे काम असे. याशिवाय फलटण लॉजवर पावसाळ्यात अतिशय गवत वाढत असे ते कापून बैलासाठी पेंढ्या बांधून ठेवाव्या छागत. १९-१०-१९२६ रोजी सदर गांधी टेकडी (चार भिंती) चा ताबा भाऊरावांना दिला, तेव्हा हमीद ए. अली भाऊरावांना म्हणाले, “या टेकडीशी टक्कर घेऊन कपाळमोक्ष करणार को काय?” पण सन १९५५ साली जेव्हा या टेकडीवर पायऱ्यापायऱ्याने
संस्थेच्या शाखांच्या इमारती झालेल्या पाहिल्यावर हमीद ए. अलींनी भाऊरावांच्या दूरदर्शीपणाचे कौतुक केले. ही जागा काढून घेण्याचा प्रयत्नही
हितशत्रंच्याकडून झाला. पण १९३७ च्या कांग्रेस मंत्रिमंडळाने मात्र तो निर्णय रद्द केला. या महाराजा सयाजीराव हायस्कूलचे स्वरूप रयत शिक्षण
संस्थेतर्फे सुर होणाऱ्या इतर हायस्कूलसाठी आदर्श ठरले; तर छत्रपती शाहू बोर्डिग हाऊस इतर हायस्कूल्सना जोडून असलेल्या वसतिगृहासाठी
अनुकरणीय ठरले.