८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ५
८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ५
१३) या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी शिक्षकांच्या अक्षरश. उड्या पडावयाच्या. कारण मिशनर्यांच्या दोन ट्रेनिंग कॉलेजेसनंतर खाजगी संस्थेतर्फे निघालेले मुंबई प्रांतातले हे पहिळे कॉलेज होते व अतिशय माफक खर्चात शिक्षण पुरे होत असे. वसतिगृहात शिक्षकांना इतर मुलाप्रमाणेच तीन-साडेतीन रुपयांच्या आत जेवण मिळत असे. दक्षिण महाराष्ट्रीय संस्थाने - औंध, फलटण, सावंतवाडी, कुरुंदवाड, मिरज, इचलकरंजी, गगनबावडा, सांगली येथून तसेच सातारा, सोलापूर येथील जिल्हा स्कूल बोर्डस् व म्युनित्तिपल स्कूल बोर्डस् यांच्याकडून शिक्षक पाठविले जात. सन १९४१ -४२ मध्ये २४० शिक्षकांपैकी ५३ स्वखर्चाने आलेले उमेदवार होते, व ५२ संस्थेच्या व्हालंटरी शाळेतील शिक्षक होते.
स्वखर्चाने आलेले शिक्षक, सातारा, नाशिक, खानदेश, पणे, सोलापूर, मुंबई, बेळगाव, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांतील होते. या कॉलेजमध्ये
शासकीय नियमाप्रमाणे ट्रेन्ड पदवीधर, पदवीधर शिक्षक नेमण्यात आले होते. या ट्रेनिंग कॉलेजची सगळ्यात उल्ठेखनीय बाब म्हणजे भाऊरावांना
सत्यशोधक ब्राह्मणेतर म्हणून विरोध करणारे श्री. कृष्णाजी शंकर दीक्षित उपशिक्षणाधिकारी या कॉलेजचे पहिले प्राचार्य झाले. एवढेच नव्हे, तर
त्यांनी निवृत्तीनंतर पाच वर्षे विनावेतन काम केले. भाऊरावांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कामाचे महत्त्व पटल्याचे त्यांनी विनावेतन काम तर केलेच,
पण आर्थिक अडचणीच्या वेळी संस्थेस उसनवार पैसेही दिले. विरुध्द असलेले अनेक लोक पुढे भाऊरावांचे कार्य पाहून त्यांचे मित्र झाले.
आपल्या देशास १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेजचे नाव महात्मा फुले अध्यापक विद्यालय
असे ठेवण्यात आले.
१४) ग्रामीण प्राथमिक शिक्षकांचा ट्रेनिंगचा प्रश्न सोडविल्यानंतर भाऊरावांचे लक्ष स्त्रियांच्या ट्रेनिंग कॉलेजकडे वेधण्याचे काम सौ. हमीद अली यांचेकडे जाते. सन १९४१ साली रयत शिक्षण संस्थेचे काम व तिच्या शाखा पाहण्यासाठी त्या मसुरीवरून मुद्दाम आल्या. शाखा पाहून झाल्यावर त्या भाऊरावांना म्हथाल्या, “तुम्ही पुरुष फार स्वार्थी आहात. स्त्रियांच्या शिक्षणासाठी काहीतरी केळे काय? बन्थो ! स्त्रियांसाठी काही करण्याच्या मार्गाला लागा. काही केल्याशिवाय मी तुमचे तोंड पाहणार नाही.”
भाऊरावांना दिलेल्या ह्या प्रेमाच्या धमकीस उत्तर म्हणून १५ जून, १९४२ रोजी सातार्यात जिजामाता अध्यापिका विद्यालय सुरू करून तसे सौ. हमीद ए. अलींना भाऊरावांनी कळविले. सौ. हमीद अलींनी तात्काळ रु. ५००/- ची देणगी पाठविली. या अध्यापिका विद्यालयाची मुख्य अडचण म्हणजे ट्रेंड पदवीधर प्राध्यापिका मिळविण्याची. पहिल्या वर्षी २० विद्यार्थिनी ट्रेनिंगसाठी दाखल झाल्या. श्री. एन. एन. दोशी, बी. ए. बी. टी. पहिले प्राचार्य झाले. डॉ. वेणूताई लेले यांनी (१९४३-४४) एक वर्ष स्त्री प्राध्यापिका म्हणून विनावेतन काम केले. तसेच जिल्हा लोकल बोर्डाने श्री. कृष्णाबाई एकमकर यांना लेन्ड सर्व्हिसवर पाठविले. इतर शिक्षक महात्मा फुले अध्यापक विद्यालयांकडून येऊन शिकवत असत. सन १९४र मध्येच ट्रेनिंगसाठी येणार्या स्त्रियांसाठी सौ. लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह सुरू करण्यात आले. या वसतिगृहाची व्यवस्थाही शाहू बोर्डिंग हाऊसप्रमाणेच व दिनचर्याही त्याचप्रमाणे होती. मुलींचे सहा गट होते. पुढे या वसतिगृहात हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुली तसेच बालगुन्हेगार कोर्टाकडील मुलीही सुधारगृह म्हणून मान्यता मिळाल्याने या वसतिगृहात दाखल होत. प्राचार्यच एकदोन सेविकांच्या मदतीने या वसतिगृहाची देखरेख करीत.
१५) याच पद्धतीने पुरुषांसाठी सन १९५० साली आष्टे, ता. वाळवे, जि. सांगली येथे लठ्ठे अध्यापक विद्यालय, जून १९५२ मध्ये रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे छत्रपती शाहू अध्यापक विद्यालय, जून १९५४ मध्ये पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालय, कुसूर, ता. कराड, जि. सातारा येथे, तर जून १९५५ मध्ये महाराजा माधवराव. शिंदे अध्यापक विद्यालय, जामगाव, जि. अहमदनगर येथे विद्यालये सुरू करण्यात आली. याखेरीज १९६२ साली माहुली, जि. सांगली येथे विठ्ठलराव देशमुख अध्यापक विद्यालय सुरू करण्यात आले. ही सर्व अध्यापक विद्यालये ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे येथील शिक्षण शहरी विभागापेक्षा खर्चाच्या दृष्टीने ग्रामीण शिक्षकांना परवडण्यासारखे आहे. प्रामुख्याने ग्रामीण शिक्षकांसाठीच ही विद्यालये होती.
Hits: 99