८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ४
८. रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य - ४
११) सन १९२१-२२ पर्यंत प्राथमिक शिक्षकांना विनीत करण्यास फार वाव नव्हता. कारण खाजगी शिक्षणसंस्थांची फक्त दोनच ट्रेनिंग कॉलिजीस होती. ती सुद्धा मिशनर्यामार्फत चालवलेली. एक अहमदनगर येथे व दुसरे अहमदाबाद येथे. दूरच्या प्राथमिक शिक्षकांना ती खर्चाच्या दृष्टीने परवडण्यासारखी नव्हती. या दोन संस्था मिशनच्या असल्याने प्रवेशावरही बंधने पडत. याखेरीज इतर कारणे होती ती अशी.
(१) महात्मा फुले, आर्थर मेह्यू (शिक्षण संचालक) चंदावरकर समिती (१९२२) अँबट आणि वूड समिती (१९३७) व अनेक शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे भाऊरावही मानीत की खेड्यात काम करणारा प्राथमिक शिक्षक स्थानिक स्तरामधला असला पाहिजे.
(२) सन १९२१ नंतरच सन १९१९ च्या कायद्याने पुढारलेले, मध्यमवर्गीय व मागासलेले यांच्यासाठी शिक्षकांत आरक्षणाचे तत्त्व मान्य झाले. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांत मध्यम व मागासवर्गीयांची संख्या वाढू लागली. पण मुंबई प्रांताच्या चार विभागासाठी फक्त चारच शासकीय प्राथमिक शिक्षक ट्रेनिंग कॉलेजीस होती. तेथे फक्त ७.२% शिक्षकांचीच सोय होत होती.
(३) त्यातूनही १९२२ मध्ये जिल्हा स्कूल बोर्ड स्थापन झाल्यावर शासकीय शिक्षणखाते व लोकनियुक्त स्कूल बोर्ड यात बेबनाव सुख झाला. काही
भष्टाचारी प्रथाही बोर्डात वाढल्या, म्हणून भाऊरावांनी ग्रामीण प्राथमिक शिक्षकांसाठी ट्रेनिंग कॉलेज काढण्याचे ठरविले. भाऊरावांच्या या ट्रेनिंग
कॉलेजचा अभ्यासक्रम ग्रामीण वातावरणास सुसंगत राहावा म्हणून पुण्याजवळील लोणी येथील ग्रामीण ट्रेनिंग कॉलेजचा अभ्यासक्रम स्वीकारला. कॉलेजच्या नावात मुद्दाम 'रूरल' (ग्रामीण) हा शब्द वापरून १६ जुलै १९३५ रोजी सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज सातार्यात सुरू केले.
१२) सन १९३५ मध्ये खी. वि. द. घाटे यांचा एकशिक्षकी ग्रामीण शाळांचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यावेळच्या
मुंबई प्रांतातील मराठी बोलणार्या १० जिल्ह्यांत प्रत्येकी ३०० एकशिक्षकी शाळा होत्या. दरसाल त्यात भर पडत असल्याने कमीत कमी ३०००
शिक्षकांना विनीत करण्याचा प्रश्न होता. म्हणून भाऊराव आपल्या कल्पनेप्रमाणे प्राथमिक शिक्षकांना शक्यतो मोफत विनीत करण्यास तयार
झाले, आणि रा. ब. काळ्यांनी ६ मे १९३५ रोजी या कॉलेजसाठी सनातन्यांच्या विरोधास न जुमानता रु. ११,०००/- ची देणगी जाहीर केली आणि रयत शिक्षण संस्थेसाठी रु. १० हजारांचा ट्रस्ट आपल्या इच्छापत्राद्वारे केला. सुरुवातीस तीन वर्षे या ट्रेनिंग कॉलेजमध्ये दाखल होणाऱ्यांना फी नव्हती.