४. उपजीविकेच्या शोधात -२
४) ' हिराचंद गुमानजी ' वसतिगृहात एके दिवशी चोर शिरला असताना भाऊरावाने त्यास पकडण्याचा धाडसी प्रयत्न केला; पण चोर
निसटला. ही घटना माणिकचंद शेठजींना कळताच त्यांनी भाऊरावास आपल्या घरीच स्वसंरक्षणासाठी ठेवून घेऊन रत्नपारख्याचा व्यवसाय त्यांस
शिकविण्याचे ठरविठे. भाऊराव त्या मोहनगरीतील व्यवसायात रमले नाहीत. जसे गेले तसे निष्कांचन, निष्कलंक परतले, आणि मातापित्यांना
कोरेगावात पुन्हा भारभूत झाले.
५) कोल्हापुरातील सामाजिक व शैक्षणिक संस्कार अमिट असल्याने श्रवणबेळगोळच्या अधिवेशनात गाठभेट झालेल्या भाऊ दादा
कुदळे, दादा जिनप्पा मद्वाण्णा आदी स्नेह्यांना भेटण्यासाठी ते दुधगावला (जि. सांगली) गेठे. मराठी शाळेतील मद्वाण्णा गुरुजी आपल्या मुलांचा
सातवीच्या परीक्षेत उत्तम निकाल लागावा म्हणून त्यांना सायंकाळी शाळेत बोलावून अधिक अभ्यास घेत. यातूनच भाऊरावांना दुधगावला विद्यार्थी
आश्रम नावाची अभ्यासिका सुरू करण्याची कल्पना सुचली. मद्वाण्णाच्या मदतीने या आश्रमाचे वसतिगृहात रूपांतर करण्यात आले. ही सन १९१०
सालातली घटना आहे. या वसतिगृह्मसाठी दरसाल धान्य गोळा करण्यासाठी भाऊराव काही दिवस दुधगावला मुक्काम ठोकत असत.
६) या वसतिगृहात सर्व जातींची मुले राहावयास येऊ लागली. सुरवातीस त्यांच्या जेवणावळी जातीनिहाय, वेगवेगळ्या असत. तीनचार
वर्षात हे भेद कमी झाले व सर्व जातींची मुळे एकत्र जेवू लागली. पहाटे उठणे, गटागटाने अभ्यास करणे इत्यादी गोष्टी सरावाने एकत्र होऊ लागल्या. पुढे काले, नेर्ले व सातारा या ठिकाणी जी वसतिगृहे झाली त्यांची हे वसतिगृह प्रयोगशाळा ठरली. या वसतिगृहातून अनेक नामांकित विद्यार्थी बाहेर पडले. उदा. कवी यशवंत, कवी साधुदास, खासदार बी. सी. कांबळे, उपपोलीस महानिरीक्षक मेघाजी कांबळे इत्यादी. भाऊराव श्री.
किर्लोस्कर व श्री. ओगले याचे प्रमुख विक्रेते म्हणून काम करीत असताना या वसतिगृहास कंदील व रॅकिलचे डबे, पुस्तके, वह्या इत्यादी क्स्तू
देणगीदाखल पाठवीत. भाऊरावांना स्वत: या वसतिगृहाकडे लक्ष देण्यास कमी वेळ मिळू लागल्यावर त्यांनी सन १९१२-१३ साली स्थापन झालेल्या
दुधगाव शिक्षण प्रसारक संस्थेच्या दुसर्या वार्षिक सभेत खालील ठराव मांडून 'विद्यार्थी आश्रम” त्यांना चालविण्यास दिला आहे.
७) “शके १८३५-३६ इ. स. १९१३-१४ दुसरी वार्षिक सभा
बैठक नं. १ दुधगाव ता. २७-२-१९१४ प्रेसिडेंट रा. रा. अप्पा बाबगौंडा पाटील, दुधगाव रात्री ८ वाजता शेठ चतुर पितांबर यांच्या वाड्यात झाली. सहावा ठराव :
'मि. दादा जिनाप्पा मद्वाण्णा वगैरे मंडळीनी येथे काढलेल्या ' विद्यार्थ्यांअम या नावाच्या संस्थेची उपयुक्तता जाणून ती संस्था ऊर्जितावस्थेस
आणण्याची खटपट सर्वांनी करावी. तसेच सवडीनुसार हा आश्रम या संस्थेस जोडण्यात यावा आणि हा जोडण्याचा अधिकार व आश्रमासंबंधी
त्यावेळी जरुरी लागेल त्याप्रमाणे त्या वेळच्या मॅनेजिंग कमिटीस असावा.!
याप्रमाणे ठराव रा. भाऊ पायगौंडा पाटील ऐतवडेकर यांनी पुढे मांडीला, त्यास रा. भाऊ दादा कुदळे यांनी अनुमोदन दिल्यावर पास झाला.”
(हा ठराव देण्याचे कारण म्हणजे वरील संस्था व विद्यार्थी आअम एकाच वेळी स्थापन झाल्याचा गैरसमज आहे.)
Hits: 108