३. भाऊरावांचे शिक्षण व जडणघडण -१

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील Written by सौ. शुभांगी रानडे

प्रकरण तिसरे
भाऊरावांचे शिक्षण व जडणघडण .

१) भाऊरावांचे वडील विट्याल नोकरीवर असताना त्यांचे शेजारी एक पारशी गृहस्थ, जहांगीर रुस्तुमजी ठाणावाला राहत होते. ते अबकारी अधिकारी होते. त्यांच्या सल्ल्यानुसार भाऊराव व त्यांचे धाकटे बंधू तात्या या दोघांना कोल्हापुरी इंग्रजी शिक्षणास पाठवावे असे ठरले.
मराठी शाळेतील हसबनीस या शिक्षकाचे म्हणणे फक्त तात्यास पाठवावे, कारण भाऊरावापेक्षा अभ्यासात तो पुढे असावयाचा. बदल्यामुळे भाऊरावाचे एक वर्ष वाया गेलेले असावे. शेवटी वडिलांनी भाऊराव व तात्या या दोघांना मामासमवेत देऊन कोल्हापुरात इंग्रजी शिकण्यासाठी १९०२ साली पाठविले. राजाराम हायस्कूलची इंग्रजी पहिली ते तिसरी ही मिडल स्कूल शाखा स्वतंत्र असावी असे दिसते. बहुतेक मार्चच्या शेवटच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इंग्रजी पहिल्या यत्तेत भाऊरावांस दाखल केले असावे. ही तारीख मिळत नाही. मात्र हायस्कूलच्या दाखळ उत्तकांत भाऊरावांची इंग्रजी चौथीत १-३-१९०५ ही दाखल तारीख आढळून येते.

२) हायस्कूलमध्ये दाखल करण्याबरोबरच भाऊरावांस जैन वसतिगृहात दाखल करण्यात आलेले दिसते. सन १९०२ साली मार्च महिन्याच्या २४ तारखेस दिगंबर जैन वसतिगृहाचे रीतसर उद्‌घाटन गंगावेशीतील पार्श्वनाथ जैन मंदिरात “दक्षिण महाराष्ट्र जैन सभेने सुरू केलेल्या पाठशाळेत झाले होते. या जैन पाठशाळेत संस्कृतचा व प्राकृतचा अभ्यास करणार्‍या मुलास इंग्रजी शिक्षणास इतर हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यास परवानगी होती. (विलास संगवेकृत द. भा. जैन सभा इतिहास, पू- ७१) या सवलतीनुसार भाऊराव व त्यांचे बंधू राजाराम हायस्कूलमध्ये दाखल झाले. यावेळी भाऊरावाचे वय १५ वर्षे होते. अंगावर खेडवळ कपडे होते. खेडवळ कपड्यातील वयस्कर व जाडजूड शरीराच्या भाऊरावांकडे पाहून मुले हसू लागली. भाऊरावांस शाळेत उशिरा घातल्याने व हूडपणामुळे अभ्यासात त्यांची प्रगती यथातथाच होती. पण भाऊराव मंदबुद्धीचे खासच नव्हते. त्यांची धारणशक्ती प्रगल्भ होती, हे त्यांच्या भावी आयुष्यक्रमावरून व विचाराच्या प्रौढपणावरून लक्षात येते.

२३) भाऊरावांचा सरळसोट स्वभाव व निर्भयवृत्ती यामुळे थोड्या अवधीतच तो शाळेतील वर्गाचा तसेच वसतिगृहातील सवंगड्यांचा पुढारी झाला. सुरवातीपासूनच दिगंबर जैन वसतिगृहाचे श्री. भारदोरे नावाचे सनातनी व कर्मठ गृहस्थ व्यवस्थापक होते. व्यवस्थापक मंडळातही प्रागतिक विचाराचे सभासद नव्हते. सन १९०७ साली श्री. अण्णासाहेब लठ्ठे राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक झाले. नंतर या दिगंबर जैन वसतिगृहाचे ते प्रमुख व्यवस्थापक झाले ते शाहू महाराजांच्या सल्ल्यावरून.
१८८७ साली ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीनने एक फतवा काढला. त्यानुसार प्रत्येक शासकीय अथवा खाजगी शाळा-कॉलिजीसना जोडून वसतिगृहे काढण्याचा आदेश देण्यात आला होता. या वसतिगृहावर ज्येष्ठतम शिक्षकास नेमण्यात यावे असेही सुचविण्यात आले होते. कारण त्यांच्या नैतिक आचरणाचा व शिस्तीचा मुलांच्या पुढे आदर्श राहिला म्हणजे देशाशी एकनिष्ठ राहाणाऱ्या तरुणांची पिढी निर्माण होईल, अशी कल्पना होती. (पेपर्स रिलेटिंग टू डिसिप्लीन अन्ड मॉरल ट्रेनिंग इन स्कूल अन्ड कॉलिजीस : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिकेशन, १८९०.)

छत्रपती शाहू महाराजांनी सन १९०० मधील मुंबई प्रांतातील शिक्षण संचालक श्री. ई. जाईल्स यांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक जमातीसाठी कोल्हापुरात वसतिगृहे सुरू करण्यासाठी त्यांच्या पुढाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. हे दिगंबर जैन वसतिगृह त्यापैकी दुसरे होते. श्री.
लठ्ठे त्या वसतिगृहाचे साहजिकच व्यवस्थापक झाले.
४) दिगंबर जेन वसतिगृहावर प्रत्यक्ष देखरेख उपव्यवस्थापक भारदोरे यांचीच होती. या वसतिगृहाचे काही नियम कर्मठ व सदसद्‌विवेकास न पटणारे होते. उदा. जेवताना सोवळ्यात असावे. त्यासाठी मुलांवर 'मुकटे' वापरण्याचे बंधन होते. परंतु हें मुकटे रात्रीच्या वेळी स्वयंपाकी अंथरूण पांघरूण म्हणून वापरीत. भाऊरावाने हे मुकटे वापरण्याचे नाकारले, त्या मुकट्यापेक्षा रोज धुतलेले सुती धोतर अधिक चांगले म्हणून भाऊरावाने त्यावर बहिष्कार घातला व स्वयंपाक्यास चोप दिला. जेवणापूर्वीच मुलांनी दाढी करावी असा नियम होता. स्वत: लठ्ठे व भारदोरे मात्र केव्हाही दाढी करीत. भाऊरावांस हे खटकले. “बोळे तसा चाले या उक्तीविरुद्ध श्री. लट्ट्यांचे वागणे होते. भाऊरावानेही जेवणानंतर दाढी केली. त्याबद्दल त्याला दंड झाला. तो भरण्याचे भाऊरावाने नाकारले.
तिसरी घटना ता. २४-३-१९०८ रोजी घडली. अस्पृश्य मुलांसाठी स्थापन झालेल्या मिस्‌ क्लार्क वसतिगृहाच्या उद्घाटनास भाऊराव हजर होता. या कर्मठ भारदोरेंनी नोटीस लावली की, या वसतिगृहाच्या उद्घाटनास हजर राहिलेल्यांनी अस्पृश्यांचा संसर्ग झाल्याने भोजनगृहात शिरण्यापूर्वी स्नान करावे, अशी भाऊरावावर आंघोळीची सक्ती केली ती भाऊरावाने पुडकावून लावली. त्याचे जेवण बंद करण्यात आले. स्वयंपाकघराची दारे, खिडक्या बंद करण्यात आली. दारास कुलूप लावण्यात आले. भाऊरावास अतिशय भूक लागली होती. 'बुभुक्षितो किम्‌ न करिष्यतिर या उक्तीनुसार बलदंड भाऊरावाने एका खिडकीची तावदाने मोडून सळया वाकवून भोजनगृहात शिरून जेवणावर यथेच्छ ताव मारला. वसतिगृहाच्या नियमाच्या दृष्टीने ही भाऊरावाची तिसरी व गंभीर आगळीक होती.
भारदोर्‍्यांना डोईजड होणाऱ्या भाऊरावास वसतिगृहातून घालवून देण्याची ही नामी संधी आली. भारदोर्‍यांच्या सल्ल्यानुसार परीक्षा जवळ आल्याच्या . ऐन मोसमात श्री. लट्ट्यांनी भाऊरावास वसतिगृहातून हाकलून लावले. काही घटना अशा असतात की एकाद्या व्यक्तीच्या जीवनास कलाटणी देणाऱ्या ठरतात. ही भाऊरावाच्या बाबतीत तशीच घटना होती.

५) ट्रंक, वळकटी घेऊन वसतिगृहातून बाहेर पडलेल्या व स्टेशनकडे निघालेल्या भाऊरावास सुदैवाने त्याचा शाळकरी मित्र बाळासाहेब खानविलकर भेटला. वसतिगृहातून बाहेर काढल्याचे ऐकून त्याने भाऊरावास महाराजांच्या वाड्यावरील आपल्या बिऱहाडी नेले. बाळासाहेब खानविलकराचे वडील मामासाहेब शाहू महाराजांचे नात्याने मेव्हणे होते. त्यांनी भाऊरावाच्या बंडखोरीची हकीकत महाराजांचे कानी घातली. ती ऐकून महाराज खूष झाले. त्यांनी भाऊरावास राजवाड्यावर राहाणाऱ्या निवडक मुलांच्या समवेत राहाण्यास परवानगी दिली. भाऊराव जैन असल्याने शाकाहारी जेवण ते राजवाड्याबाहरेच घेत असत.

६) अण्णासाहेब लटठेंच्या पुढाकारानेच दिगंबर जैन वसतिगृहाच्या इमारतीत अस्पृश्यांच्यासाठी ता. ९-२-१९०८ रोजी अस्पृश्योद्वारक विद्या प्रसारक मंडळीची स्थापना करण्यात आली होती. त्या सभेस लक्ष्मीसेन जैन स्वामीही हजर होते. स्वत: लठ्ठे अस्पृश्यांसाठी निघालेल्या वसतिगृहाच्या उद्‌घाटनास हजर होते. मग ते भाऊरावाच्या बाबतीत असे कां वागले?
त्याला काही कारणे होती. सनातनी जैन मंडळी “'औ. लठ्ठे अस्पृश्यांत मिसळतात. त्यांची पानसुपारी घेतात, पण घरी आल्यावर स्नान करीत नाहीत', म्हणून त्यांच्यावर 'जिनविजय* व इतर पत्रांत टीका करू लागले होते. ही टीका भाऊरावाच्या स्नान न करण्याच्या घटनेमुळे प्रखर होऊ नये व त्यांच्या स्वत:वर बहिष्कार टाकला जाऊ नये म्हणून भाऊरावावर ही अन्याय्य व कठोर कारवाई त्यांना करावी लागली.

७) व्हावयाचा तोच परिणाम झाला. भाऊराव इंग्रजी सहावीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाला. भाऊरावास कुस्तीचा नाद होता. दिगंबर जैन वसतिगृहात असताना श्री. लठ्ठे मुलांना कुस्ती खेळण्यास लावीत. स्वत: त्यांचेबरोबर कुस्ती खेळत. राजवाड्यावर आल्यावर शाहू महाराजांचे भाऊरावाच्या या कलेकडे लक्ष गेले. त्यांनी भाऊरावास कुस्त्याबरोबर ज्येष्ठ मल्लांना मालीश करण्याचे काम दिठे. भाऊराव महाराजांच्या मर्जीतला तरुण झाल्याने, शाहू महाराजामार्फत त्याने

भाऊरावांचे शिक्षण द जडणघडण

Hits: 114
X

Right Click

No right click