प्रकरण पहिले - सामाजिक स्थिती -१
प्रकरण पहिले
अव्वल इंग्रजीतील महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती.
१) आपले चरित्रनायक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाळपणी व तारुण्यात महाराष्ट्रात सामाजिक परिस्थिती कशी होती याचा मोजका आढावा घेऊन त्यांच्या कार्य व कर्तृुत्वाकडे वळणे उचित ठेल.
२) सन १८७० च्या सुमारास ब्रिटिश राजसत्तेची पाळेमुळे भारतात व महाराष्ट्रात खोलवर रुजली होती. त्यास पुढील कारणे प्रमुख होती :
(१) इंग्रजांचे अजिंक्य आधुनिक सैन्यबळ.
(२) प्रमुख धर्मातील
लोकांत “फोडा व झोडा' नीतीचा अवलंब.
(३) एतद्देशीय संस्थानिकांना
करारमदाराने जखडून ठेवून गुलाम केलेले होते.
(४) आधुनिक
सुधारणांनी व इंग्रजी न्यायपालिकेच्या प्रस्थापनेने सामान्य लोकांना
दीपविठे.
(५) पाश्रात्त्य शिक्षण देऊन भारतीय तरुणांना इंग्रजी
राज्यकारभारात नोकऱ्या देण्याची सोय.
(६) शास्त्री, पंडित तसेच मुल्ला,मौलवीना व संस्कृत, अरबी व पर्शियन भाषांच्या पाठशाळांना मदत देऊन त्यांचा विरोध बोथट केला.
३) महाराष्ट्रात सत्तास्थानी असलेल्या व सत्तेपासून पराभूत झालेल्या ब्राह्मणांची तरुण पिढी पाश्चात्त्य शिक्षणाचा लाभ मिळाल्याने इंग्रजी राज्यास वरदान मानुन इंग्रजांची सेवा करण्यात रमली होती. मात्र वर्णाश्रम व्यवस्थेस चिकटून होती. १८५७ च्या समराच्या खुणा बुझल्या होत्या.
लोकहितवादी गोपाळराव देशमुख, न्यायमूर्ती रानडे, प्राचार्य आगरकर
अव्वल इंग्रजीतील महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती आदी ब्राह्मण समाजसुधारक नेते ब्राह्मणवर्गात सामाजिक सुधारणांची चळवळ चालवीत असले तरी मनुवादी सनातनी ब्राह्मण पुरोहित वर्गापुढे ते हतबल होते. या पुरोहितांनी बहिष्काराचे हत्यार उचलताच हे सुधारक
प्रायश्चित्त घेत व त्यांना शरण जात. यास लोकमान्य टिळकसुद्धा अपवाद
नव्हते.
४) सनातनी ब्राह्मणवर्ग वर्णाश्रम व्यवस्थेस चिकटून आपली संस्कृत विद्या किंवा पाश्चात्त्य शिक्षण ब्राह्मणांखेरीज इतरांत ज्षिरपू देण्यास तयार नव्हते. इंग्रजी शिक्षणाचा स्वत: लाभ घेऊंन इंग्रजी शासनातील नोकऱ्या स्वत:साठी कशा राहतील याचा ते प्रयत्न करीत होते. त्यामुळे इंग्रजी शासनातील कायदे अम्मलबजावणीची सत्ता त्यांचेच हाती होती. शेतकऱ्यांच्या कैफियती “'ओरिएन्टल ट्रान्सलेटर* नावाचा ब्राह्मणापैकी जो एक वर्ग होता तो ब्राह्मणांना अनुकूल अशा पद्धतीने इंग्रजी भाषेत
वरिष्ठांना सादर करी. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळणे कठीण असे. खेड्यापाड्यांतील गरीब जनतेस व शेतकऱ्यांना त्यांच्या जुलमास शरण
जावे लागे. सन १८७५ च्या सुमारास निघालेल्या आर्यसमाज, ब्राह्मो किंवा प्रार्थथा समाज, थिओसॉफिकल सोसायटी आदी धार्मिक सुधारणा करणाऱ्या संस्थांचे कार्य इंग्रजी शिक्षणाचा लाभ झालेल्या सुशिक्षितांपुरतेच मर्यादित होते.
५) ब्राह्मणाखेरीज, तुरळक ब्राह्मणेतर सोडल्यास, सारा
महाराष्ट्रीय समाज शिक्षणाच्या दृष्टीने अज्ञानांधकारात बुडालेला होता.
ख्रिश्चन धर्मप्रसाराचा हेतू मनात ठेवून फक्त परदेशी किंवा एतद्देशीय
ख्रिश्चन मिशनरी संस्थाच अस्पृश्यासह शूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांत
शिक्षणाचा प्रसार करीत होत्या. इंग्रजांच्या मदतीने सावकारी करणारे
ब्राह्मण, शेतकऱ्यांना नाडणारा ब्राह्मण पुरोहित, ब्राह्मण कुळकर्णी व
कोर्टातील ब्राह्मण कारकून व शिरस्तेदार यांच्या मदतीने अडाणी
शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून गबर झालेला ब्राह्मण जमीनदार या सर्वांच्या
गुलामगिरीत सारी ग्रामीण अडाणी जनता राबत होती.