श्री. दा. पानवलकर
१९६० नंतरच्या पिढीतील उल्लेखनीय लेखन करणारे कथाकार म्हणून ते ओळखले जात असले तरीही १९५० च्या सुमारास त्यांनी लेखनास प्रारंभ केला. गजगा, औदुंबर, सूर्य, एका नृत्याचा जन्म, चिनाब, जांभूळ आणि शुटिंग हे त्यांचं लेखन. नागर आणि ग्रामीण जीवनाच्या सीमारेषेवर वास्तवाच चित्रण करणारी त्यांची कथा अनेक कथातून सांगलीच्या जुन्या रूढी परंपरांचे चित्रण येतं. त्यांच्या अनेक कथांची उगमस्थाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनात शोधता येतात.