शाहीर पठ्ठे बापूराव
संत वाङ्मयाबरोबरच शाहिरी वाङ्मयाने मराठी भाषा अधिक समृद्ध केली, लोकप्रिय केली. संतांच्या बरोबरीने महाराष्ट्रात शाहिरी परंपरा अवतरली. अभंग, ओवी, भारुडे, आर्या ह्या संतवाङ्मयाच्या जोडीला शाहिरांची शाहिरी महाराष्ट्रात दुमदूमू लागली. लावणी, पोवाडा, भेदिक, कवने, वग हे वाङ्मय प्रकार लोकप्रिय झाले. शाहीर हे खरे लोकशिक्षकच ! सामाजिक वाईट रुढी, परंपरा, द्वेष यांवर जोरदार हल्ला करुन त्यांनी नीतीमूल्यांचा जोरदार प्रसार केला.