शंकरराव खरात

Written by Suresh Ranade

साहित्यिक, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, दलित चळवळीतील एक नेते म्हणून खरातांचा परिचय आहे. शंकरराव खरात हेही आटपाडी येथीलच.`तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र गाजले. `मी स्वत: म. फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे ` असे ते नेहमी म्हणत. १९५८ ते १९६१ या काळात `प्रबुद्ध भारत ` या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्षही झाले.

Hits: 16