धोंडो वासुदेव गद्रे

Parent Category: व्यक्तिपरिचय Category: साहित्यिक Written by सौ. शुभांगी रानडे

काव्यविहारी यांचे बाल्य कृष्णाकाठ आणि दक्षिणी संस्थाने यांच्या सान्निध्यात गेले. काव्यविहारींचा जन्म सांगलीजवळील हरिपूर येथे झाला. हायस्कूलच्या शिक्षणाकरिता त्यांना सांगलीस रोज चालत जावे लागले. उच्च शिक्षणाकरिता त्यांना बुधगावच्या संस्थानिकांचे सहाय्य झाले. पण हरिपूरसारख्या निसर्गरम्य गावात आपलं बालपण घालविण्याचं भाग्य आणि नाट्याचार्य देवलांसारख्यांचा सहवास त्यांना लाभला.

Hits: 854
X

Right Click

No right click