दीक्षित सर
केशवराव दीक्षित एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व होते. काळी टोपी, काळा कोट, स्वच्छ धोतर, सुदृढ बांधा आणि सावळेपणा हे त्याचं प्रत्यक्षदर्शी रूप. केवळ संस्कृतच्या प्रेमापोटी ते घरी संस्कृतचे वर्ग घेत असत. त्या विशेषवर्गाचे ते कोणत्याही स्वरूपातील मानधन स्वीकारत नसत. आजन्म विद्यार्थीवृत्तीने संस्कृतच्या अध्ययन, अध्यापनाचा वसा त्यांनी घेतला होता. अभिजात संस्कृत ललित साहित्याचे प्रेम आणि चोखंदळ रसिकत्व त्यांच्या ठायी प्रकर्षाने होते.