शिवनेरी
Image Source : Google |
पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हा किल्ला आहे. पुण्याच्या उत्तरेस ९३ कि. मी. अंतरावर एका डोंगरमाथ्यावर हा किल्ला बांधलेला असून डोंगराच्या मध्यभागी जवळपास ५० बौद्ध लेणी कोरलेली आहेत. किल्ला आणि लेणी एकत्रित असलेला बहुधा हा एकमेव डोंगर असावा. शिवनेरीला महाराष्ट्राच्या इतिहासात आगळे स्थान असून याच किल्ल्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला व येथील वास्तव्यातच त्यांनी स्वराज्याच्या प्रेरणेने बाळकडू मिळाले. शिवाजी महाराजांचे बालपण याच किल्ल्यात व्यतीत झाले. येथील शिवाई मंदिर, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, जिजाबाईचा पुतळा, अंबरखाना आदि स्थळे पाहण्यासारखी आहेत. |