बालकविता-६
| आकाशांत फुलें, धरेवर फुलें, वार्यावरीही फुले, माझ्या गेहिं फुलें. मनांतहि फुलें, भूगभिं सारीं फुलें !! ......नारायण वामन टिळक. |
| आली दिपवाळी, गड्यांनों, आली दिपवाळी रोज रोज शाळा, पुरे ती आला कंटाळा चार दिवस आतां, मनाला कसली ना चिंता......माधवानुज. |
| घे कुठार ! कर उगार, घाव अतां घालीं धरणीनें पोशियले .....वा.गो.मायदेव |
| गुलाब, जाई, जुई, मोगरा, चाफा, शेवंती बागेमाजी एकसरानें फुलूनियां डोलती।।१। .... दा. वि. फफे |
| केली रवीनें निजताप दुर, वाहे हराया श्रम हा समीर; ...... मोरो गणेश लोंढे |
| हे डाळिंबाचे दाणे वेड्या! घात तुझा करिता कवटी तूं कवठावरली ..... काव्यविहारी |
| मरणांत खरोखर जग जगतें; अधिं मरण, अमरपण ये मग तें......भा. रा. तांबे. |
| हे कोण बोलले बोला? राजहंस माझा निजला! दुर्दैवनगाच्या शिखरी। नवविधवा दु:खी आई ते हृदय कसे आईचे । मी उगाच सांगत नाही!............गोविंदाग्रज |
| विटीदांडूचा खेळ मजेदार धूम चालुनिया लोटली बहार गुंग झालेला बाळ खेळण्यात..........वा .गो. मायदेव |
| वासुदेव आला दारी, वासुदेव आला, चिमणा वासुदेव आला. टोपीवर मोरपिसांला खोवुनिया येथे आला...........के. नारखेडे |
| फळे मधुर खावया असति, नित्य मेवे तसे हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,.....कृष्णशास्त्री चिपळूणकर |
| पतंग उडवू चला गड्यांनों, पतंग उडवूं चला . .....अ. ज्ञा. पुराणिक. |
| पांखरा! येशिल का परतून? . मत्प्रेमाने दिल्या खुणांतुन एक तरी अठवून?पांखरा! .....नारायण वामन टिळक |
