बालकविता - ५

Parent Category: मराठी साहित्य Category: बालकविता Written by सौ. शुभांगी रानडे

पोटासाठीं भटकत जरी दूरदेशीं फिरेन,
मी राजाच्या संदनिं अथवा घोर रानीं शिरेन;......वासुदेव वामनशास्त्री खरे.
प्रभात झाली रवी उदेला ऊठ उशिर झाला;
प्रेमळ भावे सरळ मनानें वंदिं जगत्पाला.......दत्तात्रय कोंडो घाटे.
बरें सत्य बोला यथातथ्य चाला,
बहू मानिती लोक येणें तुम्हांला.......रामदास.
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामंधि ऐस आपला, उगाच भटकत फिरूं नको......अनंतफंदी.
बोल बाई बोल ग
तुझ्या बोलांचे काय वाणं मोल ग......बालकवि ठोंबरे
मज दीनेची, कींव येउं द्या कांहीं
घाला हो भिक्षा माई !......ग. ल. ठोकळ.
मरणांत खरोखर जग जगतें;
अधिं मरण, अमरपण ये मग तें......भा. रा. तांबे.
मिळे चारा चिमणीस खावयाला,
गोड पेरु मिळतात पोपटाला;......
या बाई या,
बघा बघा कशि माझि बसलि बया.......दत्तात्रय कोंडो घाटे.
रानपांखरा, रोज सकाळी येसी माझ्या घरा
गाणें गाउन मला उठविशी मित्र जिवाचा खरा. ......गोपीनाथ.
लतांनों ! सांगुं का तुम्हां, उद्यां श्रीराम येणार !
वनाला सर्व ह्या आतां, खरा आनंद होणार !.....वा. गो. मायदेव.
वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे,
तयांत मज चंदनासम न एकही सांपडे ......कृष्णशास्त्री चिपळूणकर..
श्रुतेंचि कीं श्रोत्र, न कुंडलानें
दानेंचि की पाणि, न कंकणानें ....वामन पंडित.
सुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार !
सुंदर मी होणार । हो। मरणानें जगणार. ......गोविंद.
अबलख वारुवरी बैसुनी येतो हे पाटिल
भरजरी शिरीं खुले मंदिल......ग. ह. पाटील.
असतिल तेथें जिकडे तिकडे विखरुन पडलीं फुलें
असतिल पक्षी झाडांवरती गोड गात बैसले ......ग. ल. ठोकळ.
Hits: 738
X

Right Click

No right click