राष्ट्रभक्तीपर गीत

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

राष्ट्रभक्तीपर गीत

(गीतरामायणातील -- स्वयंवर झाले सीतेचे -- या चालीवर म्हणावे )


देशासाठी जीवन आमचे, सार्थक जन्माचे !
कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे, कार्य राष्ट्रनिर्मितीचे, ।।
कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे, ।।

विशाल होता देश आमचा, वैभव जगताचे ।
अध्यात्माने शान्ती नांदती, जीवन सौख्याचे ।
तृप्त मनाने जगती मानव, भारत मातेचे ।
कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे, कार्य राष्ट्र रक्षणाचे हे ॥१॥

परकीयांच्या आक्रमणाने सर्व नाश झाले ।
बन्धुभाव सर्वस्वी तुटले, शत्रू प्रिय झाले ।
स्वाभिमान तो विसरून झाले ,गुलाम परक्यांचे ।
कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे, कार्य हे राष्ट्र रक्षणाचे ॥२॥

छत्रपतींच्या दिव्य दृष्टीने मार्ग स्पष्ट झाले ।
स्वराज्य स्थापून शिवरायानी, मन जागृत केले ।
विजयश्रीच्या मार्गावर मग नाद तुतारीचे ।
कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे, कार्य हे राष्ट्र रक्षणाचे ॥३॥

जाती भेद सर्व ते विसरुनी एकसाथ सारे ।
प्रांत भेद मिटवुनी गर्जुया, एक राष्ट्र प्यारे ।
मानवतेचे मंदिर बांधू, नतमस्तक सारे ।
कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे, कार्य हे राष्ट्र रक्षणाचे ॥४॥

कोटी कॊटी झगडुनी उजळती भविष्य राष्ट्राचे ।
स्वार्थ सोडुनी अर्पिती जीवन तरूण देशाचे ।
उंच उभारू निशाण आमुचे शाश्वत विजयाचे ।
कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे, कार्य हे राष्ट्र रक्षणाचे ॥५॥

---- प्रा. एच,यू.कुलकर्णी.

Hits: 768
X

Right Click

No right click