मराठी उद्योगप्रेमी कै. माधवराव भिडे आणि मायमराठी
मायमराठीची जन्मकथा या माझ्या लेखात मायमराठी ओआरजी चे मायमराठी कॉम मध्ये रूपांतर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक कै. माधवराव भिडे यांच्यामुळे झाल्याचे म्हटले होते. मराठी माणसांनी उद्योग सुरू करावा यासाठी त्यांनी मोठी चळवळ सुरू केली होती. त्यांचे काम पाहून आम्ही प्रभावित झालो होतो.
इ. स. २००२ मध्ये ते सांगलीस आमच्या घरी आले होते. सांगली कृष्णा क्लबचे सेक्रेटरी श्री हवालदार आणि मिरजेतील श्री हणमंतराव देवल यांच्या नेतृत्वाखाली सॅटरजे क्लब स्थापन करण्यात ज्ञानदीपने पुढाकार घेतला होता.
खरे पाहता सॅटरडे क्लब पाश्चात्य पद्धतीच्या रोटरी किंवा लायन्स क्लब
सारखे इंग्रजी नाव मराठी उद्योजकांसाठीसुरू केलेल्या मंडळासाठी वापरू नये
आणि मायमराठी हे नाव वापरावे असे मी त्यांना सुचविले होते. शिवाय सॅटरडे
क्लबच्या संकल्पनेत शनिवारी रात्री पार्टीसाठी सर्वांनी एकत्र जमायचे आणि
उद्योगाविषयी चर्चा करायची ही कल्पना मराठी संस्कृतीशी पटणारी नसल्याने
एकत्र जमण्यासाठी रविवारी दुपारी जेवण ठेवावे असेही माझे मत होते.
मग मी मायमराठी डॉट कॉम या नावाची वेगळी वेबसाईट फक्त सॅटरडे क्लबसाठी करण्याचे ठरविले आणि त्यांना त्यास संमती दिली. एक जाहिरातही वेबसाईटसाठी देऊ केली
मुलीकडे अमेरिकेला जाण्यासाठी आम्ही मुंबईला आलो तेव्हा मी त्याची घरी गाठ घेतली व सविस्तर चर्चा केली.तेथून तीन महिन्यांनी परत आल्यावर माझा त्यांचेशी संबंध तुटला. सॅटरडे क्लबही बंद पडले होते. मग मी आमच्या मायमराछी वेबसाईटचे नावच मायमराठी डॉट कॉम असे केले.
परवा फेसबुकवर सांगलीत २०१९ साली सॅटरडे क्लबची मीटींग झाल्याचे वाचले नि माझे कुतुहल जागे झाले. अधिक शोध घेता सॅटरडे क्लबची वेगळी वेबसाईट बनल्याचे माझ्या लक्षात आले. https://www.scgt.org.in
वेबसाईटवरील माहिती पाहिल्यावर मात्र ती वेबसाईट माधवराव भिडे २०१८ मध्ये कालवश झाल्यानंतर बंद स्थितात आढळून आली. अधिक शोध घेतल्यावर या सॅटरडे क्लबमधील महत्वाच्या अजित मराठे, हानरे इत्यादी मराठी उद्योजकांची श्रद्धांजली भाषणे वाचायला मिळाली. पण प्रत्येकाचे उद्योग वेगळ्या नावाने असून सॅटरडे क्लबचे काम अधिकृतपणे कोण चालवितात याचा उलगडा झाला नाही.
कदाचित माधवराव भिडे यांच्याबरोबर सॅटरडे क्लबही मराठी उद्योजकांतून अस्तंगत झाला असेल. १०० कोटी रुपयांचा धनकुंभ मराठी उद्योजकांसाठी उभा करण्याचा कै. माधवराव भिडे यांचा मनोदय मराठी उद्योजक पुरा करू शकतील का याची मला खात्री वाटत नाही.
ज्ञानदीप फौंडेशनने सर्वांना परवडेल अशा सहकारी तत्वावर भांडवल उभे करण्याच्या प्रयत्नाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला हे आपल्या मराठी माणसांच्या सावध आणि साशंक मनोवृत्तीचे प्रतीक आहे. त्यातून बाहेर पडल्याखेरीज मराठी उद्योजक निर्माण होणार नाहीत.
तन, मन, धन यांची गुंतवणूक, धाडस व तोटा सहन करण्याची तयारी असल्याखेरीज कोणताही उद्योग उभा राहू शकत नाही. नवतरूणांना तर अनुभव नसल्याने व पैशाचे पाठबळ नसल्याने हे अधिकच बिकट व धोकादायक आहे.
यासाठीच
सर्व सुखवस्तू ज्येष्ठ आमि परदेशी वास्तव्य करणारे बुद्धीमान तरूण यांना
आपले धन आणि बुद्धी भारतातील उद्योगांच्या विकासासाठी वापरायचे आवाहन
ज्ञानदीप करीत आहे. .
Hits: 296