मायमराठीची जन्मकथा

Parent Category: मराठी उद्योग Category: सॅटरडे क्लब Written by सौ. शुभांगी रानडे

 मायमराठी वेबसाईट २००१ मध्ये केली तेव्हा ती प्रथम मायमराठी डॉट ओआरजी या नावाची होती. इंटरनेटवर मराठी लिहिता यावे यासाठी प्रथम शिवाजी हा फॉंट, नंतर सीडॅकचा योगेश, मोड्युलरचा श्रीलिपी फॉंट वापरून वेबसाईट तयार करण्यात आली. मात्र वाचकांना मराठी फॉंट आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावा लागे.

तिचे रुपांतर मुंबईच्या मराठी उद्योगविश्व उभारण्यासाठी प्रयत्न करणा-या माधवराव भिड्यांच्या भेटीनंतर मायमराठी डॉट कॉममध्ये करण्यात आले. त्याची ही कथा

मायमराठी डॉट ओआरजी वेबसाईटची मूळ कल्पना 

मानवी जीवनाचा साहित्य व संस्कृती हा महत्वाचा वारसा आहे व भाषा त्यासाठी अत्यावश्यक माध्यम आहे. महाराष्ट्रीयनांसाठी तर मराठी भाषा ही जीवापाड जपण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. भोवतालची परिस्थिती व नेहमीच्या व्यवहारासाठी लागणारी स्थानिक भाषा यामुळे यात अनेक अडचणी येतात. आपल्या पुढील पिढ्यांमध्ये मराठी भाषा व संस्कृती टिकून रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र मुलांना मराठी शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही. मराठी शाळा, पुस्तके वा शिक्षक नसतात. मराठी मासिके व पुस्तकेही मिळत नाहीत. घरातही मराठीऎवजी दुसरी भाषा वापरण्याची सवय लागते व हळू हळू मराठीपासून मुले दूर होऊ लागतात. त्यांचा मराठी संस्कृतीशी असणारा संपर्क तुटत जातो. पालकांनी मराठी बोलण्याचा कटक्ष ठेवला तर मुलांना मराठी समजते थोडे बोलताही येऊ लागते. मात्र वाचणे वा लिहिणे यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा मुलांसाठी प्रभावी दृकश्राव्य माध्यमाची गरज आहे. परप्रांतांत वा परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलांकडे जाणाऱ्या व नेहमी मराठी मासिके व पुस्तके वाचणाऱ्या मराठी मंडळींना मोजक्या मराठी वृत्तपत्रांचे अंक इंटरनेटवर वाचून त्यावर समाधान मानावे लागते. वेबसाईट हे माध्यम साहित्य प्रसार व उपलब्धतेसाठी वापरणे हा यावर उपाय ठरू शकतो. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांची ही गरज भागविण्याच्या हेतूने माय मराठी वेबसाईटची कल्पना सुचली.

याच अनुषंगाने पुण्यात २००२ साली भरलेल्या ७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर   (www.mymarathi.org) माय मराठी डॉट ओआरजी या वेबसाईटद्वारे अभिजात मराठी साहित्याची ओळख करुन देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्ञानदीपने हाती घेतला. संमेलनाट्या दिवशी मी आणि सौ. शुभांगी प्रवेशद्वारावर उभे राहून मायमराठी वेबसाईटची जाहिरात व सौ. शुभांगीची मराठी माउली ही कविता छापलेले पत्रक सर्व प्रेक्षकांना वाटले. दुसरे दिवशी आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरमाऊलीचे दर्शन घेऊन वेबसाईटचे उदघाटन केले.

युनिकोड मराठी फॉंटवर आधारित  रूपांतर करण्याचे ठरविले आणि एका महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण केले. आता डायनॅमिक श्रीलिपी फॉंट आणि युनिकोड मराठी फॉंटमध्ये माहिती वाचण्याचा पर्याय ज्ञानदीपने मराठी वाचकांना दिला. 

पुढे साहित्याबरोबरच मराठी रीतीरिवाज, सण, परंपरा तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे यांच्याही माहितीचा यात समावेश करण्यात आला.  डायनॅमिक श्रीलिपी फॉंट मिळाल्यावर ही वेबसाईट सर्वांना विनासायास पाहणे शक्य झाले. मात्र तरीही गुगलसारख्या शोधयंत्रास ही मराठी अक्षरे समजत नसल्याने या वेब साईटची माहिती सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचू शकत नव्हती.

 मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज आणि इंटरनेट एक्स्प्लोअरमध्ये युनिकोड मराठी फॉंट वाचण्याची सोय उपलब्ध केली. युनिकोड मराठी फॉंट वापरून नव्या वेबसाईटही इंटरनेटवर आल्या. ओंकार जोशी यांनी गमभन नावाचा ब्राउजरमध्ये मराठी लिहिण्याचा प्रोग्राम विकसित केला व सर्वांना मोफत ऊपलब्ध करून दिला. बराहा डॉट कॉम या वेबसाईटनेही बराहा नावाचा युनिकोड मराठी फॉंट डाऊनलोडसाठी दिला. गुगल व रेडीफने इंटरनेटवर मराठी मेल लिहिण्याची सोय उपलब्ध केली. 

श्री. माधवराव भिडे यांचा सॅटरडे क्लब

त्यांच्या मराठी उद्योगाला उभारी देण्यासाठी सुरूकेलेल्या सॅटरडे क्लबची कल्पना मला आवडली. त्यांना मी सांगलीत त्यांचे कार्य सुरू करण्याची विनंती केली.त्याप्रमाणे ते सांगलीस आले. आमच्या शिल्प चिंतामणी सोसायटीत दिमाखदार परदेशी कार घेऊन ते जेव्हा आले तेव्हा सर्वजण चकित झाले. आमच्या आणि शेजारच्या गोळे सरांच्या घरी  त्यांनी त्यांच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली व मिरज एमआयडीसीतील कृष्णा क्लबचे सेक्रेटरी यांच्याकडे सांगली आणि मिरजेचे श्री. देवल यांचेकडे मिरज शाखा त्यावेळी स्थापन करण्यात आल्या. 

/p>

त्यानंतर मुंबईला त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्या क्लबसाठी मराठी वेबसाईट करण्याबद्दल चर्चा केली होती. मात्र आम्ही अमेरिकेला गेल्यामुळे ते काम तसेच अर्धवट राहिले.  या पार्श्वभूमीवर २००९ साली ज्ञानदीपने माय मराठी डॉट ओआरजी या वेबसाईटचे नामकरण मायमराठी डॉट कॉम असे व्यावसायिक केले.

परवा सॅटरडे क्लबची सांगलीत २०१९ मध्ये मीटींग झाल्याची बातमी नेटवर पाहिली  मग अधिक शोध घेता २०१८ जूनमध्ये त्यांचे निधन झाल्याची बातमी वाचली आणि सर्व इतिहास डोळ्यासमोर आला. त्यांचे एक नाशिकमधील भाषण मला नेटवर मिळाले ते खाली देत आहे.

 

गुजरातमध्ये रेल्वे खात्यात उच्च पदावर अनेक वर्षे कार्य केल्यानंतर त्यांना गुजराथी लोकांप्रमाणे मराठी लोकांनी उद्योगी व्हावे हा त्यांचा आग्रह होता.


गेल्या १० वर्षाट या वेबसाईटच्या डिझाईनमध्ये वारंवार बदल करण्यात आले. व आताची जुमलामधील वेबसाईट तयार झाली. 

आता या वेबसाईटचे संपादन डॉ. नितीन देशपांडे यांनी करावयास सुरुवात केल्याने लवकरच ही वेबसाईट सर्व मराठी वाचकांचे आकर्षण ठरेल असा मला विश्वास वाटतो. य़ा वेबसाईटवर आधारित अॅंड्रॉईड आणि आयफोन एप करण्याचाही विचार आहे.



 


Hits: 347
X

Right Click

No right click