अकौंटिंग भाग ७ - अकौंट्सचे वर्गीकरण

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योग Written by सौ. शुभांगी रानडे

अकौंट्समध्ये असेट्स व लायॅबिलिटीज हे दोन मुख्य प्रकार असतात हे आपण पाहिले. मात्र उद्योग व व्यवसायाच्या अकौंटिंगसाठी अनेक खाती वा अकौंट्स असतात व त्यांचे वर्गीकरण नीट  केले तरच  विशिष्ट प्रकारच्या अकौंट्सचा ग्रुप करून बेतशीर ट्रायल बॅलन्स व ताळेबंद करता येईल. टॅली या अकौंटिंगच्या प्रसिद्ध सॉफ्टवेअरमध्ये सर्व अकौंट्सचे वर्गीकरण करताना विषयानुरूप क्रम लावून त्यास  सूचक क्रमांक (इंडेक्स नंबर) दिले आहेत.   त्यांची विभागणी लिक्विडिटी (विनिमय) व कंपनी कायद्याच्या पद्धतीनुसार केली आहे. लगतच्या दोन अकौंट्समध्ये आणखी नवी अकौंट्स घातली तरी क्रम बदलू नये यासाठी हे सूचक क्रमांक ठराविक अंतराने दिले आहेत.
 त्यांचे वर्गीकरण खालील प्रकारे आहे
------------------------------------------------------
सूचक क्रमांक       खाते
-----------------------------------------------
10. Capital Account  - भांडवल खाते
20. Loans ( Liability) - कर्ज खाते
30. Current Liabilities - चालू देणी
40. Fixed Assets - स्थावर मालमत्ता
50. Investments - गुंतवणूक
60. Current Assets - चालू येणी
70. Branch/Divisions - ब्रँच व डिव्हिजन्स ( शाखा व विभाग )
80. Miscellaneous Expenses ( Asset) इतर खर्च
90. Suspense account - सस्पेन्स अकौंट
100. Reserves and Surplus - राखीव  व अतिरिक्त निधी
110. Bank OD Accounts - बँक ओव्हरड्रॉफ्ट खाती
120. Secured Loans - विमासंरक्षित कर्जे
130. Unsecured Loans - असंरक्षित कर्जे
140. Duties and Taxes - अधिभार व कर ( टॅक्सेस)
150. Provisions - आगामी खर्चासाठी तरतूद
160. Sundry Creditors - दॆणे असणारी खाती उदा. सर्व पर्चेस पार्टीज
170. Stock-in-hand - ताब्यातील एकूण मालाची किंमत - यात कच्चा माल व तयार वस्तू यांचा समावेश होतो.
180. Deposits ( asset) - ठेवी
190. Loans & advances ( asset) - दिलेली कर्जे व अनामत रकमा
200. Sundry Debtors - येणे असणारी खाती उदा. सर्व सेल पार्टीज
210. Cash-in-hand - ताब्यातील रोख रक्कम
220. Bank Accounts - चालू बँक खाती ( बँकेतील रक्कम)
230. Sales account - विक्री वा सेल्स खाते
240. Purchase account - पर्चेस वा खरेदी खाते
250. Direct Income  - प्रत्यक्ष उत्पन्नाची खाती
260. Indirect Income - अप्रत्यक्ष उत्पन्नाची खाती
270. Direct Expenses - प्रत्यक्ष खर्चाची खाती
280. Indirect Expenses - अप्रत्यक्ष खर्चाची खाती
500. Our own Primary Groups - आपण नव्याने केलेले प्राथमिक खाते गट ( ग्रुप)

वरील खात्यांची मुख्यत्वे चार गटांत विभागणी केली जाते
१. असेट ( मालमत्ता व येणी)
२. लायॅबिलिटी (भांडवल व देणी)
३. इन्कम ( उत्पन्न)
४. एक्स्पेंडिचर (खर्च)

Hits: 187
X

Right Click

No right click