मनाचे श्लोक १७१-१८०

Parent Category: मराठी संस्कृती Category: मनाचे श्लोक Written by सौ. शुभांगी रानडे

असे सार साचार ते चोरलेसे ।
इही लोचनी पाहता दृश्य भासे ॥

निराभास निर्गूण ते आकळेना ।
अहंतागुणे कल्पिताही कळेना ॥१७१॥
स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥

मुळी कल्पना दो रूपे तेचि जाली ।
विवेके तरी सस्वरूपी मिळाली ॥१७२॥
स्वरूपी उदेला अहंकार राहो ।
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ॥

दिशा पाहता ते निशा वाढताहे ।
विवेके विचारे विवंचूनि पाहे ॥१७३॥
जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ॥

क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ॥१७४॥
विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी ।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ॥

हरू जाळितो लोक संहारकाळी ।
परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥१७५॥
जगी द्वादशादित्य ते रूद्र अक्रा ।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥

जगी देव धुंडाळिता आढळेना ।
जनी मुख्य तो कोण कैसा कळेना ॥१७६॥
तुटेना फुटेना कदा देवराणा ।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥

कळेना कळेंना कदा लोचनासी ।
वसेना दिसेना तो जगी मीपणाशी ॥१७७॥
जया मानला देव तो पूजिताहे ।
परा देव शोधूनि कोणी न पाहे ॥

जगी पाहता देव कोटयानुकोटी ।
जया मानली भक्ती जे तेचि मोठी ॥१७८॥
तिन्ही लोक जेथून निर्माण जाले ।
तया देवरायासि कोणी न बोले ॥

जगी थोरला देव तो चोरलासे ।
सद्‌गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥१७९॥
गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी ।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोंठी ॥

मनी कामना चेटके घातमाता ।
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक

Hits: 533
X

Right Click

No right click