मनाचे श्लोक १६१-१७०

Parent Category: मराठी संस्कृती Category: मनाचे श्लोक Written by सौ. शुभांगी रानडे

अहंतागुणे सर्वही दु:ख होते ।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ॥

सुखी राहता सर्वही सूख आहे ।
अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ॥१६१॥
अहंतागुणे नीति सांडी विवेकी ।
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ॥

परी अंतरी सर्वही साक्ष येते ।
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥१६२॥
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ झाला ।
देहातीत ते हीत सांडीत गेला ॥

देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६३॥
मने कल्पिला वीषयो सोडवावा ।
मने देव निर्गूण तो वोळखावा ॥

मने कल्पिता कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६४॥
देहादीक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चीत ठेला ॥

हरीचिंतने मुक्तिकांता वरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६५॥
अहंकार विस्तारला या देहाचा ।
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा ॥

बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ॥१६६॥
बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।
म्हणे दास संदेह तो विसरावा ॥

घडीने घडी सार्थकाची करावी ।
सदा संगती सज्ज्नाची धरावी ॥१६७॥
करी वृत्ति जो संत तो संत जाणा ।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ॥

उपाधी देहेबुद्धिते वाढवीते ।
परी सज्जना केवि बाधू शके ते ॥१६८॥
नसे अंत आनंत संता पुसावा ।
अहंकार विस्तार हा नीरसावा ॥

गुणेविण निर्गूण तो आठवावा ।
देहेबुद्धिचा आठवो नाठवावा ॥१६९॥
देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी ।
विवेके तये वस्तुची भेट घ्यावी ॥

तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें ।
म्हणोनी सदा तेचि शोधीत

Hits: 638
X

Right Click

No right click