मनाचे श्लोक ९१-१००

Parent Category: मराठी संस्कृती Category: मनाचे श्लोक Written by सौ. शुभांगी रानडे

नको वीट मानू रघूनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥

न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥९१॥

अती आदरे सर्वही नामघोषे ।
गिरीकंदरें जाईजे दूरि दोषे ॥

हरी तिष्ठतू तोषला नामतोषे ।
विशेषे हरा मानसी रामपीसे ॥९२॥

जगी पाहता देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्वता सार चिंता ॥

तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पां रे तुझे काय वेचे ॥९३॥

तिन्ही लोक जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥

जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ॥९४॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥

शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलता ख्याति जाली पुराणी ॥९५॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ॥

पिता पापरूपी तया देखवेना ।
जनी दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥९६॥

मुखी नाम नाही तया मुक्ति कैची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥९७॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहू तारिले मानवदेहधारी ॥

तया रामनामी सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥९८॥

जगी धन्य वाराणसी पुण्यरासी ।
तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ॥

मुखे रामनामावळी नित्यकाळी ।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥९९॥

यथासांग रे कर्म तेही घडेना ।
घडे धर्म ते पुण्य गांठी पडेना ॥

दया पाहता सर्वभूती असेना ।
फुकाचे मुखी नाम तेही वसेन

Hits: 394
X

Right Click

No right click